esakal | इगतपुरीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार - नरहरी झिरवाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Narhar_Zilwal.jpg

इगतपुरीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार - नरहरी झिरवाळ

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (नाशिक) : इगतपुरी तालुक्याचा राष्ट्र उभारणीत मोलाचा सहभाग आहे. अनेक प्रकल्प या ठिकाणी असताना विकासाचा महामेरू आमदार हिरामण खोसकरांच्या रूपाने धावता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. स्थानिक युवकांना रोजगार व शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष अधिवेशन बोलावून येथील मतदारसंघासाठी निधी खेचून आणला जाईल, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले. भाम धरणाच्या जलपूजनप्रसंगी शुक्रवारी (ता. ३) ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, मुंबई महापालिका नगरसेवक अरविंद नाईक, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक अभियंता केतन पवार, उपअभियंता अरुण निकम, शाखा अभियंता प्रदीप पवार, सुरेश जाचक, अशोक नाईक, जनार्दन माळी, गोरख बोडके, बाळासाहेब कुकडे, रामदास धांडे, मनीषा मालुंजकर, अनिता घारे, निवृत्ती कातोरे, देवराम मराडे, पंढरी गायकर, कमलाकर नाठे, गोपाळ भगत, कैलास भगत, तात्या पाटील भागडे, अर्जुन आडोळे, मल्हारी गटकळ, अरुण गायकर, दौलत दुभाषे, मनोज गोईकणे, कृष्णा घारे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार खोसकर म्हणाले, की इगतपुरी हा आदिवासी दुर्गम भाग आहे. भूसंपादन मोठया प्रमाणात झाल्याने स्थानिक तरुणांचा रोजगार चुकीच्या धोरणामुळे परप्रांतीय नागरिकांच्या हाती गेला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भाम,भावली धरण परिसरात अत्याधुनिक सेवासुविधा उभ्या करण्यासाठी प्रयत्न करून अतिरिक्त निधीची तरतूद करावी.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

हेही वाचा: नाशिक : गुजरात पोलिसांच्या 'त्या' कारवाईची अखेर उकल

loading image
go to top