मालेगाव- उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत आनंद लुटण्यासाठी धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे तसेच विविध ठिकाणी जातात. त्याअनुषंगाने मालेगाव आगार सज्ज झाले आहे. आगाराचे अकोला, शनिशिंगणापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुक्कामी बस पाठविल्या जात आहेत. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहक व चालकांचा आपत्कालीन सुट्ट्या वगळता इतर सुट्ट्या रद्द केल्या जातात.