Nashik Accident News: भरधाव कारची 3 वाहनांना धडक; चिमुकलीसह तिघे जखमी

Accident
Accidentesakal

Nashik Accident News : कॉलेज रोडवर भरधाव वेगातील कारने तीन कारला धडक दिल्याची घटना शनिवारी (ता. १९) रात्री आडेअकराच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातामध्ये एका कारमधील दोन वर्षांची चिमुकली, तिचे वडील व वॉचमन असे तिघे जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिसांत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Speeding car collides with 3 vehicles Three injured including child Nashik Accident News)

कॉलेज रोडवर प्रि. टी. ए. कुलकर्णी सिग्नल आहे. याच सिग्नलवरून येवलेकर मळ्याकडे भरधाव कार (एमएच ०२, एवाय १८२४) जात होती. कारचालक अभिषेक अजय शिंपी (वय २६, रा. नाशिक) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने तीन कारला धडक देत अपघात केला.

या अपघातामध्ये एका कारमधील स्वामी हरिशंकर बॅनर्जी (रा. सीरिन मिडोज), त्यांची दोन वर्षांची मुलगी लिओना बॅनर्जी व त्यांचा वॉचमन त्र्यंबक पगार हे तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident
Uttarkashi bus accident: भाविकांना घेऊन जाणारी बस खोल दरीत पडली; 8 जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस घटनास्थळी पोचले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अपघातात एमएच १५ डीसी १०२०, एमएच १५ एचव्ही ४३२५ आणि एमएच १५ जीएफ ५८४६ या तीन कारचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com