Latest Marathi News | शहरात 2 वेगवेगळ्या अपघातांत 2 ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik News : शहरात 2 वेगवेगळ्या अपघातांत 2 ठार

नाशिक : महात्मानगर येथे एबीबी सर्कलकडे भरधाव वेगातील कारवरील ताबा सुटल्याने झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये कारचालका शेजारी बसलेला युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २२) रात्री घडली. आदित्य देवीदास पगारे (२१, रा. आशीर्वाद रेसीडेन्सी, बोधलेनगर, पुनारोड) असे मयत युवकाचे नाव आहे. तर, अंबड एमआयडीसीत रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत २० वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली. (speeding car hit tree at Mahatma Nagar 1 killed Nashik Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास इंडिका व्हिस्टा कारमधून (एमएच १५ एएक्स ०११४) कारचालक चैतन्य संजय विसावे व आदित्य पगारे हे दोघे एबीबी सर्कलकडे जात होते. भरधाव वेगातील कारवरील विसावे याचे नियंत्रण सुटल्याने कार सिक्स सिग्मा हॉस्पिटलजवळ झाडावर जाऊन आदळली.

या अपघातामध्ये आदित्य पगारे यास गंभीर दुखापत होऊन त्यास सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, मध्यरात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक पगार हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik News | दोषसिद्धीसाठी जलद तपास प्रक्रियेवर भर : नवनियुक्त अधीक्षक वालावलकर

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

एमआयडीसीत रस्ता ओलांडत असताना वाहनाच्या धडकेत २० वर्षीय युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अमरिश बाबुलाल कौल (२०, रा. हॉटेल सुमनचंद्र, पांडवलेणी) असे मयत युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी (ता. २३) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अमरिश हा अंबड एमआयडीसीतील सुदाल कंपनीसमोरील रस्ता ओलांडत होता.

त्यावेळी त्यास वाहनाने (एमएच १५ एचजी ८८९९) धडक दिली. यात त्याच्य डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकारयांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार पानसरे हे करीत आहे.

हेही वाचा: Nashik News : रस्ते दुरुस्तींच्या निधीतून ‘लिफ्ट’चा घाट?; ZPचा वादग्रस्त निर्णय

टॅग्स :NashikAccident Death News