नाशिक- विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत निफाड तालुक्याने वेगवेगळ्या गटांत सर्वाधिक चार पारितोषिके पटकावली; तर नांदगाव, मालेगाव, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर व त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली.