SSC Students
sakal
डीजीपी नगर: फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या शासकीय रेखा ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला या विषयांच्या वाढीव गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.