SSC and HSC Board Exam
sakal
नाशिक: विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये या परीक्षा नियोजित असून, अवघे दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांकडून अभ्यास पूर्ण करणे आणि उजळणीवर भर दिला जातो आहे. बारावीला नाशिक विभागातून १ लाख ७२ हजार ९४८, तर दहावीला २ लाख ६ हजार ०९२ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत.