Nashik Accident : जुन्या नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी जखमी
Nashik ST Bus Accident Details : नाशिकमधील आडगाव-ट्रॅक्टर हाऊस परिसरात एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार नितीन ढगे यांचा मृत्यू झाला, तर पत्नी उषा ढगे गंभीर जखमी झाल्या.
जुने नाशिक: एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीस दिलेल्या जोरदार धडकेत पतीचा मृत्यू, तर पत्नी जखमी झाल्याची दुर्घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी घडली. नितीन विष्णू ढगे (रा. बेलगाव ढगा) असे मृताचे नाव असून, त्यांच्या पत्नी उषा ढगे जखमी झाल्या आहेत.