ST Bus Fire
sakal
इंदिरानगर: विल्होळीकडे दुरुस्तीसाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने (एमएच १५, जेसी ५५१२) पाथर्डी फाटा चौकातील उड्डाणपुलावर बुधवारी (ता. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक पेट घेतला. अवघ्या काही मिनिटात बस जळून खाक झाली. बसमध्ये बिघाड झाल्याने नंदुरबार आगाराच्या या आयशर कंपनीच्या बसद्वारे नाशिककडे येणारे सर्व ४० प्रवासी जत्रा हॉटेलजवळ दुसऱ्या बसद्वारे मार्गस्थ केल्यानंतर ही बस दुरुस्तीसाठी रिकामीच जात होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.