ओझर: मालेगावहून ओझरकडे येणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेचा सात लाख ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी (ता. ३) दुपारी उघडकीस आली. या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.