नाशिक- एप्रिलचे नऊ दिवस उलटूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. ९) दुपारपर्यंत वेतनाची प्रतीक्षा होती. आधीच उशिराने त्यातही निम्मेच वेतन मिळणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.