ST Strike | नाशिकमध्ये तब्बल 142 कर्मचाऱ्यांचे निलंबन; संप अधिक चिघळण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

msrtc strike

ST Strike | नाशिकमध्ये 142 कर्मचाऱ्यांचे ST महामंडळाकडून निलंबन

नाशिक : शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या मागणीवर चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप (MSRTC Srike) पुकारला आहे. संपात सहभागी झाल्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील ८५ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता. ११) निलंबित केले. जिल्ह्यातील निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा १४२ पर्यंत पोचला आहे.

संप अधिक तीव्र व चिघळण्याची शक्यता
संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने जिल्ह्यातील ५७ कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत निलंबित केले आहे. शुक्रवारीही जिल्ह्यातील कळवण, पेठ, नांदगाव व मालेगाव तालुक्यांतील आगार वगळता इतर सर्व आगारातील सुमारे ८५ कर्मचारी निलंबित केले. रोज कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या निलंबनामुळे संप अधिक तीव्र व चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: MSRTC Strike : परिवहन महामंडळाचे तब्बल 126 कोटी रुपयांचे नुकसानखासगी वाहन थेट बस प्लॅटफॉर्मवर
बस संप सुरू असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून सेवा दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल एजंटांकडून बसस्थानकातील प्रवाशांना बोलावून इच्छितस्थळी सोडले जात आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवारी शिवशाही बससेवा शासनाच्या आदेशाने सुरू करण्यात आली. यामुळे नाशिक मध्यवर्ती बसस्थानकात पुण्याकडे जाण्यासाठी शिवशाही बसस्थानकात उभी होती. याचदरम्यान एक खासगी वाहन थेट बसस्थानकात येऊन प्लॅटफॉर्मवर उभे केले. यातून उतरलेल्या दोघांनी बसस्थानकातच अधिकाऱ्यांसमोर उभे राहून स्थानकातून प्रवाशांची पळवापळवी सुरू केली.

हेही वाचा: एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका, महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

loading image
go to top