Share Market Fraudsakal
नाशिक
Nashik Share Market Fraud : एस. टी. ट्रेडर्स’चा मोठा घोटाळा ; ७ कोटींची गुंतवणूक फसवली
45 Investors Cheated of ₹7.76 Crore in Share Market Scam : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचं आमिष दाखवून 'एस. टी. ट्रेडर्स'कडून ७ कोटी ७६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
नाशिक- शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. यात पुन्हा एका गुन्ह्यांची भर पडली असून, एस. टी. ट्रेडर्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून ४५ गुंतवणूकदारांची ७ कोटी ७६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याने तक्रारींसाठी तक्रारदारांना गुन्हे शाखेकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.