लालपरीला वाढदिवशी आस प्रवाशांची! कोरोना संकटामुळे चाकेही जागीच थबकली

st
stesakal

पंचवटी (नाशिक) : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गत ७४ वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी राज्याच्या सर्व भागात धावत आहेत. मात्र, कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संकटामुळे त्यांची चाके जागच्या जागी थांबली आहे. त्यामुळे आता या बसला व त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना आता तिच्या वाढदिवशी प्रवाशांची आस लागली आहे.(st-waiting-for-passengers-nashik-marathi-news)

लालपरीला वाढदिवशी आस प्रवाशांची

कोरोना संकटामुळे एसटीची चाकेही जागच्या जागी थबकली आहेत. त्यामुळे राज्यभरातील चालक- वाहकांप्रमाणेच इतर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह अवघड बनला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी हळूहळू लॉकडाऊन निर्बंध हटविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह आहे. जुन्या आडगाव नाका भागात महामंडळाच्या पंचवटी आगाराचा डेपो क्रमांक २ असून याठिकाणहून रोज सकाळी एकशेवीस, तर दुपारी एकशेवीस अशा दोनशे चाळीस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शहरी, ग्रामीण बसबंद असल्याने विद्यार्थी, अन्य प्रवाशांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

लालपरीला सुरू होऊन आज ७3 वर्षे पूर्ण

लालपरीला सुरू होऊन आज ७3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंचवटी डेपोत तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आगार व्यवस्थापक शुभांगी शिरसाट, वाहतूक नियंत्रक एस. के. पवार, विक्रम नागरे, योगेश लिंगायत, सी. एम. सानप, शिरीष परदेशी यांच्यासह वाहक- चालक, येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लालपरीला हार, फुग्यांनी सजविण्यात आले होते. या वेळी केकसह पेढ्यांचे वाटप करण्यात आले. बंदमुळे रोज अंदाजे पंधरा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

st
नाशिक अर्धनग्न आंदोलन प्रकरण : वोक्हार्ट व्यवस्थापनाची भूमिका योग्य?

प्रवास अखंडित

१ जून १९४७ ला राज्यात राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस पुणे- नगर या मार्गावर धावली. तेव्हापासून ७४ वर्षांपासून तिचा प्रवास अखंडित सुरू आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात एसटीने केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर अन्य वस्तूंचीही वाहतूक करून काही प्रमाणात तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला. सध्या महामंडळाच्या ताफ्यात अठरा हजारपेक्षा अधिक गाड्या असून, त्याद्वारे राज्यभरातील प्रवाशांची ने-आण सुरू आहे.

st
बांगलादेश सरकार आजपासून देणार कांदा आयातीचा परवाना

बंदकाळात महामंडळाच्या या डेपोचे रोज मोठे नुकसान होत आहे. एसटीच्या वाढदिवशी बस, चालक- वाहक सर्वच तयार आहेत, निर्बंध उठले की, बस पुन्हा सुरू होतील. - शुभांगी शिरसाट, आगार व्यवस्थापक, पंचवटी डेपो २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com