राज्यात ४५ उपजिल्हाधिकारी आता अप्पर जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

state government issued promotion 45 Deputy Collector Upper Collector

राज्यात ४५ उपजिल्हाधिकारी, आता अप्पर जिल्हाधिकारी

नाशिक : राज्य शासनाने महसूल संवर्गातील ४५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश निघाले. सध्या नाशिक रोड येथील प्रशिक्षण प्रबोधिनी येथे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, तसेच नाशिकमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले प्रज्ञा बढे मिसाळ, सरिता नरके, देवदत्त केकाण आणि सुहास मापारी यांचा देखील समावेश आहे. श्रीमती बढे सध्या धुळे येथे उपजिल्हाधिकारी आहेत तर केकाण हे नगर पाथर्डी येथे प्रांत म्हणून कामकाज पाहात आहेत.

सुहास मापारी हे नोंदणी महासंचालक कार्यालयात तर सरिता नरके या पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत. उपजिल्हधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. मात्र त्यानंतर सातत्याने प्रक्रिया रखडली असल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा होती. पदोन्नतीची फाइल मंजूर होऊनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने काही उपजिल्हाधिकारी पदोन्नतीविनाच निवृत्त झाल्याने हा प्रश्न देखील चांगलाच गाजला होता.

Web Title: State Government Issued Promotion 45 Deputy Collector Upper Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..