राज्य महिला आयोगाने मागवला कौमार्य चाचणी प्रकरणी अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रूपाली चाकणकर

नाशिक : राज्य महिला आयोगाने मागवला कौमार्य चाचणी प्रकरणी अहवाल

नाशिक : जात पंचायतीच्‍या सांगण्यानुसार वधूची कौमार्य चाचणी केली जाणार असल्‍याच्या घटनेची नोंद राज्य महिला आयोगाने घेतली आहे. याबाबत अहवाल सादर करण्याचा आदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिला आहे. त्र्यंबकेश्‍वर मार्गावरील एका रिसॅार्टमध्ये डॅाक्टर वधूची कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.

हेही वाचा: नाशिक : मनमाड रेल्वे स्थानकातून धावू लागली पॅसेंजर

त्याची दखल घेऊन त्र्यंबकेश्‍वर पोलिसांनी या विवाह सभारंभास उपस्थित राहून, कौमार्य चाचणी होणार नसल्याचा लेखी जबाब वधू आणि वर यांच्या कुटुंबीयांकडून घेतला होता. मात्र, या प्रकरणाची माध्यांमधून प्रसिद्धी झाल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी त्याची दखल घेत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले. तसेच, त्याबाबत स्पष्टीकरण करणारा सद्यःस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याबाबत उपसचिव दिया ठाकूर यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.

loading image
go to top