नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकीला ‘शैक्षणिक स्वायत्तता’ संस्थेचा दर्जा

प्राचार्य डॉ. नांदुरकर : बहुमान मिळविणारे नाशिक विभागातील पहिले महाविद्यालय
नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकीला ‘शैक्षणिक स्वायत्तता’ संस्थेचा दर्जा

नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) नवी दिल्‍ली यांच्‍यातर्फे के. के. वाघ शिक्षण संस्‍था संचलित के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयास ‘शैक्षणिक स्वायत्तता’ संस्‍थेचा दर्जा बहाल केला आहे. अशा स्वरूपाचा बहुमान मिळविणारे हे नाशिक विभागातील पहिले महाविद्यालय असल्‍याची माहिती प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर(Principal dr. k.n. nandurkar) यांनी मंगळवारी (ता.२८) झालेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस के. के. वाघ शिक्षण संस्‍थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्‍वस्‍त समीर वाघ, अजिंक्‍य वाघ यांच्‍यासह अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.एस. साने आदी उपस्‍थित होते. प्राचार्य डॉ.नांदुरकर म्‍हणाले, की सर्व निकष पूर्ण करताना महाविद्यालयाने हा बहुमान मिळविला आहे. या बदलामुळे महाविद्यालय पातळीवर अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्‍ध करून देणे, परीक्षा पद्धतीत सुटसुटीतपणा आणणे, वर्षभर नियमित मूल्यांकन करणे शक्‍य होणार आहे.

महाविद्यालयातील दहा विभागांपैकी सात विभागांना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच महाविद्यालयाला नॅकचे ए श्रेणी प्राप्त आहे. १९८४ मध्ये स्‍थापन झालेल्‍या महाविद्यालयाच्‍या कार्याचा गौरव आज जगभरात होत आहे. डॉ. कुटे म्‍हणाले, की महाविद्यालय स्‍वायत्तता झाल्‍याने नियमित अभ्यासक्रमासोबत व्यक्‍तिमत्त्व विकास, परदेशी भाषांचे ज्ञान, लिबरल आर्टसारख्या विषयांचे अध्ययन विद्यार्थ्यांना केले जाईल. त्‍यांचे करिअर घडविण्यासाठी या सर्व बाबी खूप महत्त्वाच्‍या ठरतील. प्रा. डॉ. साने म्‍हणाले, की या बहुमानानंतर महाविद्यालयाला टायर-१ इन्‍स्‍टिट्यूटचा दर्जा मिळाला आहे. त्‍याचा फायदा संशोधनासाठी होईल.

अभ्यासमंडळात तज्‍ज्ञांचा सहभाग

शिक्षणक्रमाच्‍या रचनेसंदर्भात महाविद्यालयास या माध्यमातून अधिकार प्राप्त होणार आहे. संस्‍था स्‍तरावर अभ्यास मंडळ, ॲकॅडमिक कौन्‍सिल, गव्‍हर्निंग बॉडी कार्यरत राहील. अभ्यास मंडळात आयआयटी, एनआयटी संस्‍थांतील तज्‍ज्ञ, औद्योगिक क्षेत्रातील तज्‍ज्ञ, माजी विद्यार्थी यांचा सहभाग असेल. त्यामुळे औद्योगिक संस्‍थांना अपेक्षित कौशल्‍यांचा अभ्यासक्रमात समावेश करताना इंडस्‍ट्री रेडी विद्यार्थी घडविण्यास मदत होईल.

आयडिया लॅब ठरेल उपयुक्‍त

ऑल इंडिया कौन्‍सिल फॉर टेक्‍निकल एज्‍युकेशन(all india council for technical education) मार्फत आयडिया लॅब प्रकल्‍पासाठी महाविद्यालयाची निवड झाली आहे. हा प्रकल्‍प एक कोटी १० लाख रुपयांचा असून, त्‍यापैकी पन्नास टक्‍के अनुदान एआयसीटीईमार्फत मिळणार आहे. या प्रकल्‍पासाठी देशभरातील अवघ्या ४९ महाविद्यालयांना मान्यता मिळालेली आहे. राज्‍यातील पाचपैकी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून(savitribai phule pune university) के. के. वाघ महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com