lokhandi toli.jpg
lokhandi toli.jpg

लोखंडी स्टिल चोरणारी टोळी गजाआड; जायखेडा पोलिसांची कारवाई

अंबासन (जि.नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम एंटरप्रायझेस बिल्डिंग मटेरियल दुकानात चोरट्यांनी तब्बल दोन लाख ५६ हजार रूपयांचे लोखंडी स्टिल चोरून नेले होते. यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आवाहन उभे होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण बी. पारधी तपासाची चक्रे फिरवत पाच चोरट्यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. यातील मुख्य आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.

पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल
जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महेश वसंत पवार यांचे मालकीचे राम एंटरप्रायझेस बिल्डिंग मटेरियल दुकान आहे. मंगळवार १० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानातील तब्बल एक लाख ५६ हजार रूपयांचे लोखंडी स्टिल चोरून नेले होते यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.पवार यांनी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी खाक्या दाखवताच चोरीचा गुन्हा कबूल

पोलिस अधीक्षक सचिन पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तातडीने चोरीच्या गुन्ह्यात सखोल तपास केला असता सदर आरोपी धुळे येथे पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजताच त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. जायखेडा पोलिसांनी खाक्या दाखवताच चोरीचा गुन्हा कबूल केला व सदर चोरलेला माल सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलिस हवालदार राजेंद्र सावळे व जी. एल. भोये यांनी नवापुर तालुक्यातील खेकडा गाठत चोरलेल्या मालापैकी एक लाख ९६८७५ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यातील मुख्य सूत्रधार आरोपी फरार असून त्याचा कसोशीने शोध घेतला जात असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. 


पोलिसांनी ताब्यात घेतलेले चोरटे


१) रणजित रामसिंग गामित (वय३२), 

२) परेशभाई उर्फ कमलेश भरतभाई हरपट्टी (राठोड) (वय२४),

३) पठाण सुलतानखान युसूफखान (वय३०),

४) विलासभाई सोनजीभाई काथूड (फत्तू) (वय३०),

५) सुरेश कांतीलाल काथूड (वय २८) सर्व रा. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या हद्दीतील असून अन्य चोरट्या सूत्रधाराचे नाव समजू शकले नसल्याने त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी 

जायखेडा पोलिस ठाण्यात नव्याने रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पोलिस ठाण्यात कार्यभार सांभाळताच अनेक गुन्ह्यांची उकल होऊ लागली आहे. यात शेतक-यांची व्यापा-यांनी केलेली फसवणूक सात गुन्हे दाखल झाले आहेत. यात काही व्यापा-यांनी घाबरून शेतक-यांचे शेतीपिकांचे थकीत पैसे देण्याचे कबूलही केले असल्याचे बोलले जात आहे. तर जायखेडा हद्दीतील चोरीचा वीस दिवसांत छेडा लावल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com