Diwali Festival: डिझाईनच्या पणत्या, आकाशकंदील, अन झुंबर!

Shirasath created many innovative designs for Diwali.
Shirasath created many innovative designs for Diwali.esakal

येवला (जि. नाशिक) : प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावली सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून दिवाळीनिमित्त दिवे प्रज्वलित करण्यासाठी लागणाऱ्या पणत्यासह साहित्य विक्रीला येऊ लागले आहेत. बाजारात अनेक चायना अन मशीन मेड पणत्या विक्रीला येत असल्या तरी कुंभार कारागिरांच्या हातून आकाराला आलेल्या पणत्यांशिवाय दिवाळी पूर्णच होतच नाही.

पूर्वी फक्त चाकावरील पणत्याच कुंभार बांधव बनवायचे आता ग्लोबल जमान्यात गावोगावचे कारागिर अपडेट झाले आहेत. वेगळेवेगळया डिझाईनच्या पणत्यांसह आकाश कंदील, झुंबर, म्युझिकल दिवे, टेबललॅम्प अशा विविध मातीचे साहित्य बनवून स्पर्धेत आपली जागा टिकवत असल्याची भूमिका ममदापूर येथील वाल्मिक शिरसाट या युवा कारागिराने मांडली. (Steps taken by kumbhar to survive China Made competition in diwali diya akashkandil Nashik News)

ममदापूर, पिंपळगाव लेप, पाटोदा भागातील कुंभारबांधवानी आपली कला विस्तरली आहेत. दीपावलीसाठी विविध प्रकारच्या पणत्या बनवण्यात कारागिर व्यस्त आहेत. नव्या काळात तंत्राच्या झगमगाटात सणांचा दिमाख वाढत गेला. तो विशिष्ट पातळीवर आवश्यक मानला तरी सणांत पारंपरिक वस्तूंचे महत्त्व तितकेच टिकून आहे. पणती, बोळके या साहित्यातून हे महत्व कळते. याचमुळे शेकडो प्रकारच्या पणत्यांची बाजारात स्पर्धा आहे. अशा स्पर्धेतही अनेक जन टिकाव धरून आहेत.

ममदापूर येथील वाल्मीक शिरसाठ हे कुंभार कारागिरांचे संपूर्ण कुटुंब पणत्या व बोळके बनवण्यात मग्न झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांनी बनवलेल्या विविध साहित्याला औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव, नाशिक आदी भागात मोठी मागणी आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पणत्या व इतर साहित्य बनवण्यासह सुकवण्यास विलंब होत असल्याने अनेक ठिकाणी मागणी असूनही साहित्य पाठवणे शक्य होत नसल्याचे ते सांगतात.

त्यातच बाजारपेठेमध्ये गेल्या वर्षापासून राजस्थानी पणत्या विक्रीस येत असल्याने कुंभाराने तयार केलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी घटल्याची खंत कुंभार व्यासायिकांनी व्यक्त केली आहे. वडिलोपार्जित व्यवसाय हे कुंभार करत असले तरी दिवसेंदिवस मातीपासून बनवलेल्या पणत्या व बोळकेची मागणी घटल्याने व सततच्या पावसामुळे पणत्या सुकत नसल्याने मोठा फटका बसला आहे. तरीही आपली दिवाळी अंधारात जाऊ नये या आशेने हे कुंभार पणत्या, बोळके तयार करताना दिसत आहेत. पहिल्या टप्प्यात तयार साहित्य विक्रीला बाजारात उपलब्ध झाले आहेत.

Shirasath created many innovative designs for Diwali.
Healthy Plan for Diwali : ‘चटपटीत’चा टाळा मोह, पौष्टिक आहारातून सुदृढ रहा..!

विविध साहित्याचे असे आहेत दर

- पणती साध्या ः २० रुपये / कलर २५ रुपये डझन

- डिझाईन ः ५० रुपये डझन

- साधे बोळके - ४० रुपये / कलर ५० रुपये डझन

- आकाशकंदील मातीचे - ५० रुपये,७० रुपये,१२० रुपये

- म्युझिकल दिवा - २० रुपये

- माशाचा दिवा - २० रुपये/ बदक दिवा २० रुपयाला पाच

- पणती स्टॅन्ड मातीचे - ५० रुपये

- वाटे दिवा - ५० रुपये

"आमची तिसरी पिढी या क्षेत्रात असून चाकावरील पणत्यांची जागा आता अनेक व्हरायटीच्या दिवाळीच्या साहित्याने घेतली आहे. औरंगाबाद, धुळे, जळगावपर्यंत आमचे दिवाळीचे हे साहित्य जाते. यंदा मागणी आहे परंतु सततच्या पावसामुळे अपेक्षित साहित्य तयार करता आलेले नाही. सततच्या पावसामुळे माती मिळविण्यासह तयार केलेले साहित्य सुकविण्याची अडचण झाल्याने यावर्षी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे." - वाल्मिक शिरसाठ, कारागीर, ममदापूर

Shirasath created many innovative designs for Diwali.
Diwali Festival: आयात घटल्याने फटाके दरांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ; मागणीदेखील वाढणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com