नाशिक : बस स्थानकात उभ्या शिवशाही बसेसवर दगडफेक | ST Bus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stones were hurled at Shivshahi ST buses parked at bus stand in Nashik

नाशिक : बस स्थानकात उभ्या शिवशाही बसेसवर दगडफेक

नाशिक : संपाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग बसस्थानकात उभ्या केलेल्या दोन शिवशाही बसची समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केली. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुंबई नाका पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्थानकातच बसची तोडफोड झाली.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवशाही बसची चाके थांबली आहेत. शहरातील महामार्ग बसस्थानकात प्रसन्ना पर्पल कंपनीच्या सहा शिवशाही बस उभ्या केल्या आहेत. गुरुवारी (ता. ११) सायंकाळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा समाजकंटकांनी दोन शिवशाही (एमएच १४, जीयू ०६३८) व (एमएच १४, जीयू ०३५८) बसवर दगडफेक केली. यामुळे एका बसची मागील काच फुटली, तर एका बसचे टेललॅम्प फुटले. बस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चौघांना दगडफेक करताना पाहिले. नंतर त्यांनी आरडाओरडा करत समाजकंटकांचा पाठलाग केला. मात्र, चौघे पळून गेले.
दगडफेकीची माहिती कळताच प्रसन्ना पर्पल कंपनीचे अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी बसस्थानकात पाहणी केली.

हेही वाचा: नाशिक : जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेस मारहाण; बाळाचा मृत्यू

प्रवासी सेवेबाबत संभ्रम

गुरुवारी (ता. ११) प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. नंतर महामार्ग बसस्थानकात उभ्या शिवशाही बसवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आल्याने आता प्रवासी वाहतुकीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: नाशिक : इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

loading image
go to top