Former MLA Sanjay Chavan submitting a memorandum to Tehsildar Kailas Chavade, protesting against the felling of trees.
sakal
सटाणा - विकासकामांच्या नावाखाली बागलाण तालुक्यासह भीमाशंकर, कर्जत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्वत्र सुरू असलेली जंगलतोड तत्काळ थांबवावी, वृक्षतोडीच्या परवानग्यांची चौकशी करावी आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास सार्वजनिक करावा, या मागण्यांसाठी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व पर्यावरणप्रेमींतर्फे बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देऊन जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला.