esakal | गिरणारेत पुरेशा ऑक्सिजनअभावी रुग्ण दाखल करणे थांबविले!

बोलून बातमी शोधा

Girnare

गिरणारेत पुरेशा ऑक्सिजनअभावी रुग्ण दाखल करणे थांबविले!

sakal_logo
By
राम खुर्दळ

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : ऑक्सिजन तुटवड्याचा फटका शहरासोबत आता ग्रामीण भागालाही बसत असल्याने उपलब्ध ऑक्सिजनवर रुग्णसेवा सुरू आहे. त्यामुळे नव्याने रुग्ण दाखल करून घेणे ऑक्सिजनअभावी शक्य होत नसल्याची माहिती गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरच्या अधिकृत सूत्राने दिली. दरम्यान, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणाचा ग्रामीण भागातही परिणाम दिसत आहे. मुळत: ऑक्सिजनची प्रतीक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील गिरणारेच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये या भागासह अन्य तालुक्यांतील रुग्ण उपचार घेत आहेत. २० ऑक्सिजन बेडच्या रुग्णालयात सध्या ४५ हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याने उपलब्ध कर्मचारी राबत आहे. कोविड सेंटरसाठी एक एमडी सर्जन (फिजिशियन), दोन वॉर्डबॉय, एक लॅब टेक्निशियन, दोन सिस्टर, दोन शिपाई हवे आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांत तिघे बाधित आहेत. त्यामुळे मोठी धावपळ उडते, ताण वाढत आहे. एकूणच तोपर्यत शासनाच्या ऑक्सिजनची वाट बघत आहेत. ऑक्सिजन आल्यास नवीन येणारे रुग्ण दाखल करता येतील. ऑक्सिजन पाइपलाइन व टाकीची पाहणी तांत्रिक व्यवस्था करीत असते. सध्या उपलब्ध व्यवस्थांवर सेवा सुरू असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहते यांनी सांगितले.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..