नाशिक- यंदा अवकाळी पावसाने नाशिकचे मैदान गाजविल्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाची अडचण झाली आहे. पावसाळापूर्व कामे यंदा करावीच लागणार असल्याने त्यासाठी लगबग सुरू झाली असून, गुरुवारी (ता. १५) कामांना सुरवात केली जाणार आहे..महापालिकेकडून दरवर्षी पावसाळापूर्व कामे हाती घेतली जातात. त्यात वृक्षांचा विस्तार कमी करण्याबरोबरच पावसाळी गटारी व नाल्यांची स्वच्छता तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातात. त्यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते..यंदाच्या आर्थिक वर्षातदेखील अंदाजपत्रकामध्ये जवळपास 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नाल्यांची साफसफाई केली जाते, मात्र नाले साफ होतात की नाही? हे बघितले जात नाही. किंबहुना सर्वसामान्य नागरिकांना या संदर्भातील माहिती मिळत नाही. नियमितपणे पाऊस सुरू झाल्यानंतर गटारी तुंबतात, त्या वेळेस महापालिकेने ज्यांना कामे दिली त्या ठेकेदारांकडून कामे झाली की नाही याचा सोक्षमोक्ष लागतो. अनेकदा महापालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडते. .यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच अवकाळी पावसाने शहरांमध्ये दाणादाण उडवून दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले, गटारी स्वच्छ नसल्याने अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. विशेष करून सिडको व सातपूर भागामध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. तर केटीएचएम कॉलेज, द्वारका, कालिदास कलामंदिर, शालिमार चौक या ठिकाणी रविवारी पडलेल्या पावसामुळे पाण्याचे टक्के तयार झाले. .दरवर्षी अवकाळी पाऊस पडत नाही. यंदा मात्र नियमित पावसाळ्यापूर्वीच अवकाळी पाऊस झाल्याने आता महापालिकेच्या बांधकाम विभागाला पावसाळी गटारींची स्वच्छता करणे भागच आहे. त्या अनुषंगाने १५ मेपासून पावसाळी गटारी व नाले साफसफाई कामाला सुरवात केली जाणार आहे..Solapur: 'पाच मिनिटे पाऊस; पाच तास वीज गायब', मजरेवाडीत विजेअभावी नागरिकांनी जागून काढली रात्र...या ठिकाणी करावी लागणार स्वच्छतातीन लाख ६३ हजार २२ मीटर लांबीच्या गटारीएक लाख २१ हजार मीटर लांबीचे पावसाळी नालेआरसीसी चेंबर तीन लाख ६३ हजार २२ मीटर लांबीतेरा हजार ९४६ चेंबर९२ हजार ७७१ मीटर खुल्या गटारी