02871
बारीपाडा : वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस.
------
PNR126B08754
पिंपळनेर : येथे पावसाने लावलेली हजेरी.
---------
धुळे जिल्ह्यात पावसाची हजेरी
साक्रीच्या पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. १७ : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी (ता. १७) सायंकाळी साडेचारपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रोपणी केलेल्या भात पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता असून, सोयाबीन पिकाचे मात्र नुकसान झाले आहे.
बारीपाडा आणि साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भात पिकाच्या वाढीबाबत शेतकरी चिंतेत होते. अशा परिस्थितीत शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भात पिकाला आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार आहे.
याबरोबरच साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी विजांच्या मोठ्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बल्हाणे, कुडाशी, आंबापाडा, दरीपाडा यांसह परिसरातील काही गावांमध्ये पाऊस झाला. पिंपळनेर शहरातही ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्यानंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मात्र, सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहिले.
----
रब्बी हंगामासाठीही फायदेशीर
पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामानंतर हरभरा, मसूर आणि वाटाणा ही रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सध्याच्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत झाल्यास आगामी रब्बी हंगामातील पेरणीसाठीही त्याचा फायदा होऊ शकतो.शनि