
Nashik News: मालेगावचे न्यायाधीश तेजवंतसिंगांच्या त्या निकालाची होतेय सर्वत्र चर्चा! काय अजब आहे जाणून घ्या
मालेगाव (जि. नाशिक) : शुल्लक कारणातून झालेल्या भांडणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १३ वर्षांनी या गुन्ह्यातील आरोपीस न्यायाधीश यांनी आगळीवेगळी शिक्षा सुनावल्याने या शिक्षेची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. (strange punishment for accused of praying namaz 5 times day planting trees and conservation result of malegaon judge tejvantsingh sandhu nashik news)
कॅम्प भागात मोहम्मद शरीफ अब्दुल मज्जिद यांच्या दुचाकीला रिक्षा चालक रउफ खान उमर खान (वय ३० क्रांतीनगर, सोनापुरा झोपडपट्टी) याने जबर धडक दिली होती. दुचाकीला धडक दिल्याने दोघांमध्ये शिवीगाळ करत रिक्षा चालक रउफ याने मोहमंद शरीफ यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली होती.
मारहाणीत शरिफच्या दाताला व डोळ्याला मार लागला होता. या संदर्भात शरीफच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचे कामकाज न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांच्या न्यायालयात सुरु होते.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
या खटल्याचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या गुन्ह्यातील संशयिताविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांनी आरोपी रउफ खान याला २१ दिवस रोज दिवसातून पाच वेळा होणाऱ्या नमाज कॅम्प भागातील सोनापूरा मशिदमध्ये अदा (पठण) करावी. सोनापुरा मशिदीजवळ दोन वृक्ष लागवड करून त्याची निगा राखावी आणि तसेच एक हजार रुपये दंड ठोठावला.
मारहाणीचा हा प्रकार सोनापूरा मशिदीजवळ घडल्याने आरोपीला नमाज पठण व वृक्ष लागवड करण्याची शिक्षा दिली. तसेच रऊफच्या शिक्षेसंदर्भात त्यांनी कृषी अधिकारी व सोनापुरा मशीदचे इमाम यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. यापूर्वी न्यायाधीश श्री. संधू यांनी असंख्य तुटणारे संसार पुन्हा रूळावर आणले आहेत.