Success Story : देवळ्याच्या लेकीची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी; राज्यात OBC संवर्गात मुलींमध्ये आली दुसरी

Vatsala Aher, Jayashree Aher, Prafulla Aher, Sunil Aher, Dr. Nutan Aher celebrating the election of Tejaswini Aher as Deputy Collector.
Vatsala Aher, Jayashree Aher, Prafulla Aher, Sunil Aher, Dr. Nutan Aher celebrating the election of Tejaswini Aher as Deputy Collector.esakal

देवळा (जि. नाशिक) : कुटुंबाची साथ, आत्मविश्वास अन प्रामाणिक कष्टाची साधना करत येथील तेजस्विनी प्रफुल्ल आहेर हिने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा २०२१ च्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात ती इतर मागासवर्ग संवर्गात राज्यात मुलींमध्ये दुसरी तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिची १०३ क्रमांकावर आहे. (Success Story of tejaswini aher from deola getting post of Deputy Collector in MPSC Exam second among girls in OBC category in state nashik news)

तेजस्विनीचे मूळ गाव देवळा असून माजी सरपंच (कै.) पी.के. अप्पा आहेर यांची ती नात आहे. कुटुंबात राजकारणाचा वारसा असला तरी आपण प्रशासनात सेवेत करियर करायचे या ध्येय तिने निश्‌चित केले होते.

यासाठी तिने भरपूर मेहनत घेत अभ्यास करत यशाचा डोंगर सर केला आहे. तेजस्विनी ही पहिल्या प्रयत्नात केवळ सात गुणांनी हुलकावणी दिली असली तरी दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळवले.

तेजस्विनी हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिचे देवळा येथे झाले. बारावीनंतर तिने सिंहगड कॉलेज (पुणे) येथे इंजिनिअरिंगची मेकॅनिकल पदवी मिळवत २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. क्लास व अभ्यासिकेत दहा-अकरा तासांचा अभ्यास, वर्तमानपत्रातील टिपणे-चालू घडामोडी, संदर्भ पुस्तकांचे वाचन यातून हा यशाचा मार्ग केल्याचे तेजस्विनीने 'सकाळ' ला सांगितले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Vatsala Aher, Jayashree Aher, Prafulla Aher, Sunil Aher, Dr. Nutan Aher celebrating the election of Tejaswini Aher as Deputy Collector.
Song Shooting : ‘चल चल जाऊ बाजाराला’ गाण्याचे जोगमोडीत चित्रिकरण; स्थानिक कलाकारांचा सहभाग

या संपूर्ण यशात तेजस्विनीला कुटुंबाची मोठी साथ मिळाली. तिची आई जयश्री व वडील प्रफुल्ल आहेर हे शेती करतात तर काका सुनील आहेर व काकू माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन आहेर हे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

"धीर खचू न देता प्रयत्न व आत्मविश्वास कायम जिवंत ठेवल्याने हे यश मिळवू शकले. ग्रामीण भागातील मुलामुलींनी मोबाईलचा फक्त अभ्यासासाठी वापर करावा आणि वेळेचा सदुपयोग करत करिअर करावे." - तेजस्विनी आहेर, देवळा

"नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी हाऊ आनंद मोठा शे. आमले तिना अभिमान वाटस."

- वत्सलाबाई आहेर, माजी नगरसेविका

Vatsala Aher, Jayashree Aher, Prafulla Aher, Sunil Aher, Dr. Nutan Aher celebrating the election of Tejaswini Aher as Deputy Collector.
Unique Wedding : नारळवृक्ष भेट देऊन भाचीचे कन्यादान! मेहंदीतून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com