Street Foodsakal
नाशिक
Street Food : उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीला अभय?
अन्न औषध प्रशासन नेमके आहे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला जात आहे.
मालेगाव कॅम्प- शहरात शेकडो हॉटेल, उपहारगृह व नाश्ता सेंटर आहेत. खाद्यपदार्थांची अनेक दुकाने हातगाड्यांवर थाटण्यात येतात. मात्र त्यातील स्वच्छतेसह दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. उघड्यावर अन्न पदार्थ विकणाऱ्यांवर कोणाचाही वचक नाही. अन्न औषध प्रशासन नेमके आहे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला जात आहे.
