esakal | राजकीय पक्षाच्या नावाखाली कायदा हातात घ्याल; तर पडेल महागात - पो. आ.पांडे
sakal

बोलून बातमी शोधा

deepak pandey

राजकीय पक्षाच्या नावाखाली कायदा हातात घ्याल; तर पडेल महागात - पो.आ.पांडे

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : राजकीय पक्षाच्या (political party) नावाखाली कार्यकर्त्यांनी कायदा (law) हातात घेण्यास सुरवात केली, तर त्यांना समाजकंटक गुंडाप्रमाणेच वागविण्यात येईल. त्यांना कोणतीही मुभा मिळणार नाही. राजकीय पक्षाने हा इशारा गांभीर्याने घ्यावा, असे पोलिस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्तांचा स्पष्ट इशारा

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जनमाणसासाठी काम करतात. त्यामुळे त्यांना काही बाबींमध्ये सूट मिळू शकते. आंदोलने व तत्सम बाबी पोलिस समजून घेतात. मात्र या सवलतीच्या आड कार्यकर्ते जर कायदा हातात घेत असतील, तर लोकशाही मूल्यांची पायमल्ली झालेली खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्तांनी दिला. कायदा हातात घेणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची नावे थेट गुंडाच्या यादीत टाकण्यात येत असून, यापुढे अशा कार्यकर्त्यांविरोधात पोलिस तीच भूमिका घेतील, जी इतर प्रकरणांत गुंडांविरोधात घेतली जाते. हा नियम सर्वच पक्षांना लागू असून, याची दखल आतापासूनच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.

हेही वाचा: पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लस द्या- छगन भुजबळ

कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई : पांडे

राजीवनगर येथील घटनेप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्याला गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरोधात कारवाईसुद्धा झाली आहे. मात्र, कायदा हातात घेणाऱ्या राजकीय पक्षांची गय न करता कठोर कारवाई करण्यात येईल. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त