esakal | कठोर निर्बंधांची जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

कठोर निर्बंधांची जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona virus) रोखण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने कठोर निर्बंध जारी केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी मंगळवारी (ता.11) मध्यरात्रीपासून (midnight curfew) होणार आहे. दरम्‍यान भाजीपाला विक्री सकाळी सात ते दुपारी बारा तर दुधविक्री सकाळ व सायंकाळच्‍या वेळी करण्यास मुभा दिलेली आहे. (strictly lockdown in nashik marathi news)

कठोर निर्बंधांची जिल्‍ह्‍यात आजपासून अंमलबजावणी

जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता.11) यासंदर्भात सविस्‍तर सूचना जारी करत चर्चेतून उद्भवलेले संभ्रम दुर केले आहेत. मांढरे म्‍हणाले, की ग्राहकांना खरेदीसाठी जीवनावश्यक बाबींचे दुकानात जाण्यास प्रतिबंध असला तरी विविध मार्गांनी घरपोच जीवनावश्यक बाबी प्राप्त करून घेता येतील. त्यामुळे विनाकारण साठा करून ठेवू नये.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होत नसल्याने बाजार समिती बंद ठेवल्‍या जातील. त्याच वेळी शेतकऱ्याकडील भाजीपाला व अन्य माल स्वीकृत करण्यासाठी विकेंद्रित व्यवस्था तयार करण्याबाबतची मुभा व निर्देश संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितींना दिले आहेत. त्‍यानुसार त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. शहरांतर्गत अथवा राज्यांतर्गत शेतमाल वाहतुकीस कोणताही प्रतिबंध केलेला नाही.

हेही वाचा: भारतीय संरक्षण विभागाचा कणा 'एचएएल'; कामगारांमध्ये मात्र नाराजी

भाजीपाल्‍याची सकाळी, तर दुधाची सकाळ-सायंकाळ विक्री
भाजी विक्रीची वेळ सकाळी सात ते दुपारी बारा ही निश्चित केली आहे. दूध विक्री घरपोच करण्याचे निर्देश दिले आहेत. घरपोच विक्री पूर्णतः शक्य नसल्यास दूध विक्री सकाळी सात ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था निश्चित करेल अशा ठिकाणावरून करता येईल. या ठिकाणांवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमाचे उल्लंघन झाल्यास, विक्री पुढील दहा दिवसांकरिता ताबडतोब बंद केली जाईल.

हेही वाचा: ''मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"

कंपन्‍या एकत्रितरित्‍या करू शकतील कर्मचाऱ्यांची व्‍यवस्‍था
उद्योगधंद्यांबाबत इन सीटू उद्योग सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. त्‍यानुसार उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था होऊ शकते, त्यांनी तशी व्यवस्था करावी. अशी व्यवस्था करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसेल अशा कंपन्‍यांनी, अन्‍य उद्योजकांना एकत्र घेत व्‍यवस्‍था करता येईल. उद्योगाच्या दोन किलोमीटर परिसरातील निवास योग्य इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची सोय करण्यास मुभा राहिल. कमीत कमी मनुष्यबळात कंपन्या सुरू ठेवतांना कर्मचार्यांनी ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील. मर्यादित मनुष्यबळासह औषधनिर्माण, ऑक्‍सिजन निर्मिती कंपन्‍या सुरु राहतील, असेही स्‍पष्ट केले आहे.