धुळे- भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने जिल्ह्यातील असंख्य शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जात आहे. त्याविषयी कुठलाही ठोस सकारात्मक निर्णय जाहीर न करता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गप्प राहणे पसंत केल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे, अशी सूचना यंत्रणेला दिली.