esakal | RTE प्रवेशासाठी पुन्‍हा मुदतवाढ; प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना अद्याप संधी नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पुन्‍हा मुदतवाढ

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत राखीव प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना खासगी शाळांत मोफत प्रवेशाची प्रक्रिया लांबत चालली आहे. पंचवीस टक्‍के राखीव जागांच्‍या प्रवेशाकरिता सोडतीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुन्‍हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार गुरुवार (ता. १५)पर्यंत प्रवेश निश्‍चित करता येतील. दुसरीकडे प्रतीक्षायादीतील विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्‍या संधीपासून वंचित राहत आहेत. (students have been given re-extension for rte admission)


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. मुदतवाढ संपल्‍यानंतर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा पालकांना लागून होती. परंतु शिक्षण विभागाने पुन्‍हा एकदा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यानंतर ११ जूनपासून प्रवेश निश्‍चितीच्‍या प्रत्‍यक्ष प्रक्रियेला सुरवात झाली होती. महिन्‍याभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप प्रवेशाची प्रक्रिया संथगतीनेच सुरू आहे. दुसरीकडे शाळांमध्ये अध्ययन प्रक्रिया सुरू असल्‍याने विद्यार्थ्यांच्‍या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे. वाढीव मुदत देऊनही प्रवेश निश्‍चित होत नसतील, तर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश का दिले जाऊ नये, असा प्रश्‍नदेखील पुढे केला जातो आहे.
दरम्‍यान, नाशिक जिल्ह्यात चार हजार २०८ विद्यार्थ्यांची नावे सोडतीत जाहीर केली होती. शुक्रवार (ता. ९) दुपारपर्यंत दोन हजार ६५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले होते. दोन हजार २३६ विद्यार्थ्यांचे तात्‍पुरते अर्ज दाखल आहेत. तात्‍पुरते प्रवेश झालेल्‍या विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीत प्रवेश निश्‍चितीची संधी असणार आहे.

(students have been given re-extension for rte admission)

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे

loading image