
Nashik News : कडनोर वस्तीच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांमुळे भागली तहान!
सोनज (जि. नाशिक) : जिल्हा परिषदेच्या कडनोर वस्ती (ता. चांदवड) येथील शाळेत शिक्षकांच्या पाठपुराव्यामुळे व पदरमोड करून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. (students of Kadnor zp school slum water crisis solved by teachers Nashik News)
या शाळेत अनेक वर्षे सुविधांचा अभाव होता. पाणी, वीज, ई लर्निंगची असुविधा, ना चांगला रस्ता होता. काही दिवसांपूर्वी सरपंच दयानंद अहिरे यांच्या माध्यमातून ५० इंची टीव्ही मिळाला. वीज नसल्याने अनेक समस्या शाळेमध्ये आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी, वापरासाठी, स्वच्छतेसाठी पाणी उपलब्ध नव्हते.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक लक्ष्मण काळे व सहशिक्षिका मनीषा दुकळे यांनी यावर्षी शाळेमध्ये पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार विनंती केली. त्यावर श्री. अहिरे यांनी एक कुपनलिका व विद्युतपंप बसवून दिला. शाळेतील शिक्षक लक्ष्मण काळे यांनी मित्रांच्या मदतीने व स्वखर्चाने शाळेमध्ये वीज उपलब्ध करून पाण्याची समस्या सोडविली.
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
हेही वाचा: Nashik News: दिव्यांग निंबा सावंत यांची खडतर प्रवासातून भरारी! थेट मलेशियात अभ्यास दौऱ्यावर नियुक्ती
दुर्दैवाने कुपनलिकेचे पाणी येणे बंद झाले. दुसरी कुपनलिका चारशे फूट लांब असताना चारी खोदण्यासाठी जेसीबीचा खर्च सागर बिडगर यांनी देण्याचे आश्वासन दिले. पाईप व त्यापुढील खर्च, टाकी ठेवण्यासाठी ओटा, हँडवाश स्टेशन आदींसाठी लागलेला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च दोन्ही शिक्षकांनी केला.
गवंडी काम करणारे आप्पा अहिरे यांनी कुठलीही मजुरी न घेता विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्यासाठी मोफत श्रमदान केले. अखेर जुन्या वर्षाला निरोप देताना शाळेत पाणी पोचवले.
हेही वाचा: Nashik News: भारत्तोलन स्पर्धेत मुकुंद आहेरला सुवर्णपदक; 4 राष्ट्रीय विक्रम करणारा राज्यातील पहिलाच खेळाडू!