नाशिक : वारली पेंटींगद्वारे चिमुकल्यांनी रंगविल्या घरांच्या भिंती

Warli Painting
Warli Paintingesakal

नाशिक : दोन्‍ही हातांनी लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा, अशी ओळख निर्माण केलेल्‍या हिवाळी (ता. त्र्यंबकेश्‍वर) या शाळेमार्फत आणखी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्‍या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातील घरांच्‍या भिंतींवर वारली चित्रशैलीने रेखाटन केले आहे. यामुळे संपूर्ण पाड्याचे रुपडे पालटले आहे.

प्रत्येक चित्रात आदिवासी जीवनशैलीचे प्रतिबिंब

शाळेचे शिक्षक केशव गावित यांच्‍या प्रयत्‍नांतून सर्व विद्यार्थी एकाच वेळी आपल्‍या दोन्‍ही हातांनी लिखाण करतात. शाळेची इमारत व प्रांगणात ज्ञानाचा सागर वाहतांना बघायला मिळतो. नेहमीच नावीन्‍यपूर्णतेचा ध्यास बाळगणाऱ्या या शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्‍या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातील घरांना वारली चित्रशैलीने रेखाटन केले आहे.
रेखाटलेल्‍या प्रत्येक चित्रातून येथील आदिवासी जीवनशैलीचे प्रतिबिंब दिसून येते. यामध्ये त्यांचे सण, उत्सव, निसर्गावर आधारित त्यांची जीवनशैली, निसर्गातील पक्षी, प्राणी, झाडे, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शेतीशी निगडित गोष्टींसह एकूणच ग्रामीण भागातील जीवन याद्वारे अधोरेखित केले आहे. या उपक्रमाच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रकलेचा सराव तर झालाच, सोबत त्‍यांना आपल्‍या संस्‍कृतीची ओळख होण्यास मदत झालेली आहे. या उपक्रमासाठी गिव्ह संस्था व इतरांचे सहकार्य लाभले.

Warli Painting
सरकारचा मोठा निर्णय! पॅकेट पाहून समजेल तुमचं खाणं किती Healthy
Warli Painting
तुमच्या घराच्या स्वप्नांसाठी या बँका देतात कमी व्याजदराने Home Loan

तब्‍बल दोन महिने केला सराव

या उपक्रमासाठी एकूण तीन महिन्यांचा कालावधी लागला. सर्व मुलांनी प्रथम त्यांच्या ड्रॉइंग बुकवर तब्‍बल दोन महिने वारली चित्रकृती रेखाटण्याचा सराव केला. यानंतर पुढील एक महिन्यामध्ये कार्डशीटवर ब्रश व कलरचा वापर करत चित्र रेखाटले. त्यानंतर चार दिवसांत ३० मुलांनी गावातील सर्वच घरे वारली चित्रशैलीने रेखाटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com