लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sub-inspector of police and an employee arrested for taking bribe

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सिडको (नाशिक) : दुकानदार महिलेवर खोटा गुन्हा दाखल करून तिला जामीन मिळाल्यावर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अंबड पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. २४) रात्री अटक केली.

कैलास सोनवणे (उपनिरीक्षक) आणि दीपक वाणी (शिपाई), अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. दोन दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विविध तक्रारीवर कारवाई करत असून, दोन दिवसांत लाचलुचपतने तीन कारवाया करत लोकसेवकांना लाच घेताना पकडले आहे. दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला पकडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिलेचे सिडको भागात कापड विक्रीचे दुकान असून, तिच्यावर उपनिरीक्षक सोनवणे आणि शिपाई वाणी यांनी कठोर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच ती न्यायालयातून जामिनावर सुटताच या लाचखोरांनी तिच्याकडे १५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी सायंकाळी पथकाने सापळा रचला. दोघेही लाच घेत असताना त्यांना लाचलुचपत विभागाने पकडले.

हेही वाचा: नाशिक | पाच हजारांचा लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

loading image
go to top