Success Story | जिद्द : अपंगत्व झुगारून सुरश्रीताईंची उद्योगभरारी!

Surshree rahane
Surshree rahaneesakal

विधात्याने दिलेलं सुंदर आयुष्य म्हणजे मनुष्यजन्म. त्याचे सार्थक करण्यासाठी स्वतःचे ध्येय निश्‍चित करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरश्रीताईंनी कंबरच कसली. अपंगत्व कमी व्हावे, म्हणून तब्बर दहावी इयत्तेपर्यंत १५ शस्त्रक्रिया झाल्या. तरीही अपंगत्व झुगारून ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अडचणी आल्या तरी त्या सुटणाऱ्या असतात, या आत्मविश्वासावर थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वकंपनीची मालकीण बनून ओळख निर्माण केली, ती भगूर येथील उद्योजिका सुरश्री राहाणे यांनी... (Success Story Defying disability industrialist Sushree rahane nashik news)

Surshree rahane
NMC Tax Recovery : दीडशे पैकी 117 कोटींची यंदा घरपट्टी वसुली!; महापालिका प्रशासनाला दिलासा

स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे भगूरचे नाव इतिहासात अजरामर झाले. याच भगूरमध्ये राहाणे परिवारातील सुरश्रीताईंनी अतिशय कमी वयात स्टार्टअपच्या माध्यमातून युवा पिढीला संदेश दिला आहे. त्यांचे शिक्षण बी.टेक., एम. बी. ए. वडिल राजेंद्र राहाणे, आई सुनंदा तसेच सुरश्री व कौस्तुभ असे कुटुंब. कुटुंबातील रामदासशेठ व सिंधूताई रामदास राहाणे यांनी स्वातंत्र्याच्या संग्रामात आपले योगदान दिलेल्या राहाणे कुटुंबातील सुरश्री या ज्येष्ठ कन्या. वडिल राजेंद्र राहाणे सिव्हील इंजिनिअर असले तरी सराफी व्यवसायातून पुढे आलेलं कुटुंब.

पायावर तब्बल १५ शस्त्रक्रिया

सुरश्री जन्मापासूनच अपंग...पायावर जन्माच्या १५ व्या दिवशीच शस्त्रक्रिया झाली. दहावीत येईपर्यंत तब्बल १५ शस्त्रक्रिया झाल्या. मात्र त्यात अपयश आले. वॉकर आणि सुरश्री असे जणू शाळेत समीकरणच बनले होते. नाशिकच्या सेंट पॅट्रीक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते बारावीपर्यंत वर्गात प्रथम क्रमांक कायम राहिला.

अभ्यासात हुशार व शिक्षकप्रिय विद्यार्थिनी अशी ओळख होती. दहावीला बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्कॉलरशिप परीक्षेत देशभरातून शंभर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत जपानमध्ये जाण्याची संधी मिळाली.

व्यवसायाकडे कल असलेल्या सुरश्री यांनी बी.टेक., एमबीएचे शिक्षण पूर्ण करतानाच इंटर्नशिपच्या निमित्ताने मार्केटिंग या विषयात शिकण्याची संधी मिळाली. तिचे सोनं करताना अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होत स्वतःला स्टार्टअप या विषयात झोकून दिले.

Surshree rahane
Nashik News : शहरातील रस्ते होणार काँक्रिटचे!; डांबरीकरणावर फुली

टर्निंग पॉईंट

२०१६ मध्ये पेप्सिको या कंपनीत त्यांची एचआर विभागात प्रमुख म्हणून निवड झाली. मात्र त्यांनी मार्केटिंग विभागात नेमणुकीची विनंती केली. त्याची दखल घेत कंपनीने दिलेल्या संधीमध्ये करिअर शोधतानाच प्रचंड परिश्रम घेतले. पानटपरीपासून ते मॉलपर्यंत विक्रीव्यवस्था सांभाळणाऱ्या सुरश्रीताईंनी या कंपनीच्या उत्पादनांना भारतासह थायलंड या देशातही भक्कम विक्री व्यवस्‍था मिळवून दिली.

त्यानंतर त्यांनी एचपी या संगणक आणि लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात त्यांनी सेवा देतानाच ओळख उभी केली. स्वतःमध्ये असलेल्या आत्मविश्वासातून स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम सर, राहुल नार्वेकर (द इंडिया नेटवर्क), डॉ. अनिल सहस्रबुद्धे (माजी अध्यक्ष AICTE), प्रा. संजय इनामदार (परोपकारी), डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये (भारताचे पासपोर्ट मॅन) यांचे वैयक्तिक मार्गदर्शन तसेच पती अमोल यांच्यासह आईवडीलांनी दिलेलं प्रोत्साहनची मोलाचं ठरलं.

विक्री प्रतिनिधी ते मालकिण

जगातील स्टार्टअपची गरज लक्षात घेऊन याच विषयावर त्यांनी काम सुरू केले. ‘इयरबुक कॅनव्हास’ या नावाची स्वतःची कंपनी स्थापन करत स्वतःच सीईओ म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली. अतिशय अल्पावधीतच जगभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी कंपनी आपले योगदान देते. ‘बँडबाजा ब्राईड’ या कार्यक्रमातून वैवाहिक आयुष्याला सुरूवात केली. स्टार्टअपच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखल घेत कोविडच्या आधी आणि नंतरही २०१९ मध्ये जोश टॉकमध्ये दोन वेळी सहभागी होत.

सुमारे दीड लाख व्हिवर्स त्यांनी मिळवले. आंतरराष्ट्रीय पातळीवर टेड टॉक्स शोमध्येही सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला. इयरबुक कॅनव्हासच्या माध्यमातून संपूर्ण भारतासह ऑस्ट्रेलियातही कंपनीचे काम सुरू आहे. आगामी वर्षात २०२३ मध्ये यूएसए आणि सिंगापूरमध्येही कंपनीची तयारी सुरू आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Surshree rahane
Nashik News : मालेगाव, सुरगाण्यात सर्वाधिक Model School!

इयरबुक कॅनव्हासला भक्कम आधार

इयरबुक कॅनव्हासला पुढे नेताना या कंपनीसाठी महाराष्ट्रातून डॉ. शिरीष घन, नाशिक (ENT विशेषज्ञ), दीपक नाकील (ग्लोबल एमडी युनिसॉफ्ट), जयश्री हारक (उद्योजक), नंदकुमार ढेकणे (माजी सीईओ जीई इंडिया), अमित वायकर (एमडी डोहलर साउथ ईस्ट एशिया), मिलिंद आवळगावकर (व्हीपी सप्लाय चेन, एशिया, स्टॅनले ब्लॅक अँड डेकर), राजेंद्र नेवास्कर (राहुरीचे व्यापारी), हर्षवर्धन धोटे (सिडको) ), संकल्प मडावी (BPCL), शशिकांत चौधरी (सिरियल उद्योजक), अमित कारडा (कॅनडा), दीपक फडणीस यासह ७ देशांमधूल गुंतवणूकदारंनी या कंपनीसाठी गुंतवणूक करत कंपनीला सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी योगदान दिलंय.

नेटवर्किंग प्लॅटफॉर्म बनवायचंय...

शिक्षणक्षेत्रात योगदान देतानाच युवा पिढीसमोरची बेरोजगारी कमी करण्यासाठी स्टार्टअप या विषयात त्यांच मोठं काम सुरू आहे. जगातील सर्वोत मोठं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपली ओळख उभी राहिली त्या नाशिकमधून स्टार्टअप इको सिस्टम हब सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. स्वतः तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले.

Surshree rahane
Nashik News : पोलिस ठाण्यासाठी निरीक्षकांची आयुक्तांकडे ‘लॉबिंग’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com