Agniveer Success Story: खंडागळीची श्रद्धा कोकाटेची गगनभरारी; भारतीय नौदलात अग्नीवीरपदी निवड

Shraddha Kokate, who was selected as a firefighter in the Indian Army Navy, along with Vaishali Kokate, a laboring farmer woman from Khadangli (T.Sinnar). Neighbors Sheetal Kokate, Omkar Kokate
Shraddha Kokate, who was selected as a firefighter in the Indian Army Navy, along with Vaishali Kokate, a laboring farmer woman from Khadangli (T.Sinnar). Neighbors Sheetal Kokate, Omkar Kokateesakal

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

Agniveer Success Story : कुटुंबातील कर्ता पुरुष गेला की कुटुंबाचा आधारस्तंभ हरवला आहे असे समाजात रूढ आहे. परंतु खडांगळी (ता. सिन्नर) येथील श्रमिक शेतकरी महिला वैशाली कोकाटे याला अपवाद ठरल्या आहेत.

त्यांनी कष्ट करून लेकींच्या पंखात बळ भरले अन् लेकींनीही यशाची भरारी घेतली. शेतकरी महिला कुटुंबातील श्रद्धा माधव कोकाटे ही भारतीय सैन्यदलातील नौदलात अग्निवीरपदी निवड झाली आहे. (Success Story Khandagali Shraddha Kokate Selection as Agni Veer in Indian Navy nashik news)

खडांगळीत तेरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० ला वडिलांचे शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यातून वैशाली कोकाटे यांनी न खचता मुलांचा सांभाळले, त्यांचे शिक्षक पूर्ण केले. त्यांची थोरली शीतल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.

भाऊ ओमकार शिक्षण घेत आहे. श्रद्धाने वेगळी वाट निवडून अग्नीवीर झाली आहे. श्रद्धाचे मामा इंडियन आर्मी नौदलात कोचीला आहे. मामांसारखे बनायचे हे स्वप्न उराशी बाळगून तीने प्रयत्न केले.

अखेर ते प्रयत्न आज सफल होताना दिसत आहे. मुख्य कडवा कॅनालच्या हद्दीत निमगाव देवपूर पंचांळे रस्त्याला वस्तीवरील बागायती शेती वैशाली कोकाटे यांनी केली. श्रद्धाने बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य भरती प्रक्रिया सुरू केली.

श्रद्धाने नौदलातील लेखी परीक्षा अभ्यासक्रम सुरू केला. दररोज खडांगळी मळा येथे आई वैशाली सोबत शेती काम करून पुन्हा वडांगळीला येऊन सकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत प्रवास केला. नौदलात भरती होण्याच्या वाटा शोधताना परिक्षा देण्यासाठी मुंबई गाठली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shraddha Kokate, who was selected as a firefighter in the Indian Army Navy, along with Vaishali Kokate, a laboring farmer woman from Khadangli (T.Sinnar). Neighbors Sheetal Kokate, Omkar Kokate
Success Story : जिद्द, मेहनतीच्या बळावर मजुरांची मुले पोलिस खात्यात!

नौदलाची परिक्षा असल्याचे कळल्यानंतर ऑनलाइन परिक्षा अर्ज भरले. नाशिकहून मुंबई गाठली. कुलाबा येथे नौदलाची भरती प्रक्रिया पूर्ण झाली अन् त्यात उत्तीर्ण झाली.

देशात २८० जणांची भारतीय सैन्यदलातील नौदलात अग्नीवीर पदासाठी निवड झाली आहे. त्यात श्रद्धा माधव कोकाटे आहे. आता श्रद्धा ओडिसाला प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

"पती माधव यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी कष्ट घेतले. ‌श्रद्धाने अभ्यास करून आज त्या कष्टाचे चीज झाले आहे."

वैशाली कोकाटे, आई

"आईच्या कुशीत जे पाठबळ लाभले. त्याचे यश आहे. सेल्फ स्टडी हा माझा अभ्यासाचा केंद्रबिंदू होता‌. लहानपणी इतरांसारखे करिअर करावे असे नेहमी वाटायचं. नौदलात जाण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे." -श्रद्धा कोकाटे, अग्नीवीर

Shraddha Kokate, who was selected as a firefighter in the Indian Army Navy, along with Vaishali Kokate, a laboring farmer woman from Khadangli (T.Sinnar). Neighbors Sheetal Kokate, Omkar Kokate
HSC Success Story: शेतीकामाचे ओझे पेलूनही पायल, आरती टॉपर! शिकण्याची उमेद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com