Success Story : एक हात नसला तरी पायात पदक मिळवण्याचे बळ; पेठचा दिलीप गावीत तरुणाईसाठी Icon

जिंकण्याची जिद्द असेल तर जीवनातील संघर्षाशी सामना करण्याची प्रेरणा आपोआप मिळते.
Tribal Development Minister Dr.Vijaykumar Gavit felicitating Dilip Gavit for winning silver medal in the US competition.
Tribal Development Minister Dr.Vijaykumar Gavit felicitating Dilip Gavit for winning silver medal in the US competition.esakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिंकण्याची जिद्द असेल तर जीवनातील संघर्षाशी सामना करण्याची प्रेरणा आपोआप मिळते. अशाच जिद्दीने भारावलेल्या पेठ तालुक्यातील तोरणडोंगरीच्या दिलीप गावित या खेळाडूने उजवा हात नसतानाही अमेरिकेतील खुल्या धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावत तरुणांसाठी ‘आयकॉन’ ठरला आहे. (Success Story of disabled dilip gavit win in america Icon for youth in Peth nahsik news)

युवकांना छोट्याशा गोष्टीवरून नैराश्य येते आणि त्यातून आत्महत्येसारखे चुकिचे पाऊल ते उचलतात. मात्र, बालपणीच डावा हात गमावलेल्या दिलीप महादू गावित या खेळाडूने आपली जिद्द सोडली नाही.

पेठ येथील दादासाहेब बीडकर महाविद्यालयात एस. वाय. बी. ए. या वर्गात शिकत असलेल्या दिलीपने खेळाकडे लक्ष दिले. खेळाविषयी त्याची निष्ठा आणि परीश्रम बघून परळीवैजनाथ येथील प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला खेळाडू म्हणून दत्तकच घेतले आहे.

नाशिकमधील महात्मा नगर येथे ते त्याच्याकडून नियमितपणे सराव करुन घेतात. जगाच्या पाठिवर कुठेही स्पर्धा असेल तर त्यात सहभागी होण्यासाठी त्यांचे प्रोत्साहन दिलीपला मिळते. अमेरिकेच्या रिझोना येथे मे २०२२ मध्ये झालेल्या खूल्या स्पर्धेत त्याने रौप्यपदकाला गवसणी घातली.

राष्ट्रीय स्पर्धेतही तो आता सहभागी होतो. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवण्याची त्याची महत्वकांक्षा आहे. त्याच्या यशाबद्दल आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते त्याचा नाशिकमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला.

Tribal Development Minister Dr.Vijaykumar Gavit felicitating Dilip Gavit for winning silver medal in the US competition.
HSC Exam : कोरोना नंतर पहिल्यांदाच नियमित परीक्षा! विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश

वैजनाथ काळे यांच्यासारखे ‘द्रोणाचार्य’ आहेत म्हणून दिलीपसारखे खेळाडू जगाच्या कानाकोपर्यात नावलौकिक मिळवत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून इतर खेळाडूंना सहकार्य केल्यास त्यांच्याही आयुष्य प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही.

आई, वडील शेतकरी

पेठ तालुक्यातील तोरणडोंगरी गावचे रहिवासी असलेले गावित कुटुंब आजही शेती करतात. दिलीपचे वडील महादू गावित व आई मोहनाबाई यांच्यासोबतीला भास्कर, आनंदा व चिंतामण ही मुले देखील आहेत.

ही सर्वजण गावाकडे शेती आणि तिच्याशी निगडीत कामे करतात. त्याच्या कष्टातून प्रेरणा घेवून दिलीपने क्रीडा क्षेत्रात आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. जिद्दच्या बळावर त्याला यशस्वी व्हायचे आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Tribal Development Minister Dr.Vijaykumar Gavit felicitating Dilip Gavit for winning silver medal in the US competition.
Nashik News : संगणक खरेदी अनियमितता प्रकरणी दोषींवर कारवाई : ZP CEO मित्तल

"ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होवून देशासाठी पदक मिळवण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची माझी तयारी आहे. हात नसला म्हणून काय झाले, पायात धावण्याचे बळ आहे. आपणही देशाचे नाव उज्वल करु शकतो, हे जगाला दाखवून द्यायचे आहे."
- दिलीप गावीत, खेळाडू, पेठ

चांगल्या कर्माची लोक घेतात प्रेरणा

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
सयत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥

भगवद गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला आहे. मनुष्याने आयुष्यात चांगले कर्म करत रहावे. त्यातून अन्य लोक प्रेरणा घेतील आणि त्यासमान वागण्याचा प्रयत्न करतील. श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो.

Tribal Development Minister Dr.Vijaykumar Gavit felicitating Dilip Gavit for winning silver medal in the US competition.
Dhaka Short Film Festival: जागतिक स्तरावर लखलखतोय ‘आरसा’; ढाका आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com