HSC Exam : कोरोना नंतर पहिल्यांदाच नियमित परीक्षा! विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश

HSC Board Examinations
HSC Board Examinationsesakal

येसगाव (जि. नाशिक) : बारावीच्या (उच्च माध्यमिक) प्रमाणपत्र परीक्षेचा कार्यक्रम जाहीर झाला असून २१ फेब्रुवारी इंग्रजी पेपरने परीक्षांचा श्री गणेशा होणार आहे. २० मार्च सोमवार पर्यंत वेळापत्रकानुसार विषयावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. (First regular exam after Corona HSC Examination Instructions to provide necessary facilities to students nashik news)

कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी नियमित परीक्षा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्मवर नमुद केलेल्या केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी दिलेल्या वेळे आधी येणे बंधनकार आहे.

उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षण खात्याच्या नियमानुसार केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. कॉपी प्रकरणाला आळा बसण्यासाठी विभागाकडून अधिसूचना जारी करून नवे व कडक नियम करण्यात आले आहे.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात काही उच्च माध्यमिक शाळांमध्ये परीक्षा केंद्र मिळालेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाकडून सुचना करण्यात आलेल्या असतात.

परीक्षा केंद्रांवर संबंधित शिक्षण खात्याकडून परीक्षा पूर्वी पहाणी करणे गरजेचे ठरणार आहे. शिक्षण विभागाकडूनही परीक्षेची पूर्ण तयारी केली जाते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा पासून वंचित राहणार नाही याची परीक्षा केंद्र शाळांनी दखल घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

HSC Board Examinations
Subsidy on Milch Animals: दुधाळ जनावरे खरेदी अनुदानात दुपटीने वाढ! जाणुन घ्या लाभ

या सूचनांचे करावे लागणार पालन

विद्यार्थी ज्या वर्ग शाळेत परीक्षा देत आहे, त्या खोल्यांमध्ये भरपूर प्रकाश असावा. उन्हाळ्याची सुरूवात होत असल्याने, शाळेवर जर पत्र्याचे शेड असल्यास तेथे भरपूर हवा येण्याची गरज आहे.

वीज असल्यास पंख्यांची सोय असावी. वीज नसल्यास प्रसंगी जनरेटरची सोय करावी. हवेशीर वर्ग असावा.वर्गामध्ये भिंतींची दुरावस्था नसावी. भिंतीवर मोठे तडे नसावे, प्लॅस्टर निघालेले नसावे. पिण्याच्या पाण्याची सोय असावी.

बसण्याचा बाक हा लिहितांना हालणारा नसावा. तसेच स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे .अशा सुविधा असाव्यात. शाळेत जमिनीवर पिण्याच्या पाण्याची टाकीची सोय असेल तर टाकी जवळचा परिसर स्वच्छ असावा.

परीक्षा पूर्वी शिक्षण खात्याकडून एक वेळा सुविधांची पाहणी करणे आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना मन उत्साहीत राहील असे वातावरण निर्मिती पाहिजे.

HSC Board Examinations
Shabari Gharkul Yojana : कुडा- मातीसह झोपडीतील 8500 आदिवासी बांधवांना हक्काचा निवारा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com