Success Story: मालेगावचा प्रथम दृढ संकल्पाच्या जोरावर सैन्यदलात स्कॉड्रन कॅप्टन; प्रशिक्षणानंतर होणार रुजू

Success Story pratham dole become Squadron Captain in Army nashik news
Success Story pratham dole become Squadron Captain in Army nashik news
Updated on

Success Story : अभ्यासू वृत्ती, खडतर परिश्रम, जिद्द, चिकाटी, स्वप्नपूर्तीचा ध्यास, आई-वडील, आजोबा व प्राध्यापकांचे मार्गदर्शन या बळावर खडकवासला येथील ‘एनडीए’चे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून कॅम्प भागातील प्रथम विवेक डोळे याने भारतीय सैन्यदलात स्कॉड्रन कॅप्टन होण्याचे स्वप्न साकार केले आहे.

त्याच्या या राष्ट्रीय स्तरावरील नेत्रदीपक यशाबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. येथील सेवानिवृत्त प्रा. बी. एम. डोळे यांचा तो नातू व विवेक डोळे यांचा मुलगा आहे. (Success Story pratham dole become Squadron Captain in Army nashik news)

प्रथम याने रोहा (जि. रायगड) येथील जे.एम.राठी इंग्लिश स्कूल शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात त्याने अधिकारी होण्याचे निश्‍चित केले होते. त्याहेतूने कराटे, पोहणे यासारख्या खेळामध्ये त्याने सुवर्णपदक पटकाविले होते. खेळाबरोबरच अभ्यासातील प्रगती लक्षणीय होती. दहावीत त्याने ९२ टक्के गुण प्राप्त केले होते.

यानंतर ११ वी १२ वी साठी सर्व्हिस प्रिपरेटरी अकादमी छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश घेतला. बारावीनंतर एनडीएची प्रवेश परीक्षा दिली. या परिक्षेसाठी देशातून अंदाजे २ लाख विद्यार्थी बसतात. त्यातून राज्यातील फक्त ६० विद्यार्थी निवडले जातात. अत्यंत अवघड अशा या लेखी व तोंडी परिक्षेत प्रथमने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. तथापि, शारीरिक क्षमता परीक्षेत तो यशस्वी झाला नाही.

अपयशाने खचून न जाता भारतीय सैन्यात जाण्याचा त्याचा दृढ संकल्प कायम राहिला. बारावीनंतर प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश घेऊन दुसऱ्यांदा शारीरिक क्षमतेत सुधारणा करत पुन्हा एनडीएची परीक्षा दिली.

Success Story pratham dole become Squadron Captain in Army nashik news
Success Story: नौदलास गवसणी घातलेल्या हर्षलच्या सत्काराला जमला अख्खा गाव! प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून गरुडझेप

दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाल्याने त्याला एनडीएला प्रवेश मिळाला. पुणे खडकवासला येथील राष्ट्रीय रक्षा अकादमीत ३ वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे स्वप्न साकार झाले.

३० नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पासिंग आउट परेड पार पडली. यात प्रशिक्षणासह अभ्यासासोबतच वॉटर पोलो, बोट पुलिंग, पोहणे यासारख्या खेळात सुवर्णपदके मिळविले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला स्क्वॉड्रन कॅप्टन बनविण्यात आले आहे.

एक वर्षानंतर होणार लेफ्टनंट

प्रथमचे डेहराडून येथील एक वर्षाचे पुढील प्रशिक्षण झाल्यानंतर तो भारतीय सैन्यात लेफ्टनंट या पदावर रुजू होईल. प्रथमच्या या कामगिरीमुळे त्याचे वडील विवेक व आई सुजाता यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचवेळी शालेय शिक्षणापासून बाळगलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद प्रथमला मोठे समाधान देऊन गेला.

Success Story pratham dole become Squadron Captain in Army nashik news
Success Story : ‘शाळा सोडून तू स्वयंपाक कर’, शिक्षकांनी मारलेल्या टोमण्यावर चिडून तिने भरारी घेतली थेट NASA मध्ये पोहोचली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com