Success Story: रस्त्यावरील वस्तू विक्री ते शोरूमची मालकीण! वणी येथील पावविक्रेत्या पुष्पाताई बनल्या उद्योजिका..

Pushpatai pawar chaudhary
Pushpatai pawar chaudharyesakal

जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच नियतीनं कुंकू हिरावलं... दोन्ही मुलींसाठी आई-वडिलांची माया देताना दोन वेळच्या भाकरीसाठी सुरू असलेली धडपड अवघड असली तरी परिस्थिती नक्कीच बदलते, या सकारात्मक विचारांवर थेट नियतीलाच आव्हान दिलं...

कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी पाव, विडीविक्री करून सुरू झालेला प्रवास पत्रावळी विक्रीद्वारे उद्योजिका बनल्या त्या वणी (ता. दिंडोरी) येथील तेली गल्लीतील पुष्पाताई पवार-चौधरी..! (Success Story Pushpatai pawar chaudhary bread seller from Vani became an entrepreneur nashik)

पुष्पाताई यांचे माहेर धुळे शहरातील, तर सासर वणी येथील... शिक्षण-दहावी पास... वडील सुभाष पंडित चौधरी यांची परिस्थिती जेमतेम... अकाली आलेल्या अपंगत्वातही कुटुंबासाठी वडील झटत होते. पत्नी लीलाबाई यांच्यासह दोन मुले, दोन मुली असं सहा जणांचं कुटुंब...

सुभाष चौधरी धुळे शहरात तांगा चालवत, तर पुष्पाताईंच्या आई परिसरातील खेड्यांवर जाऊन फळेविक्री करून कुटुंबाला आधार देत होत्या. जबाबदारी पेलवताना चौधरी कुटुंबाने पुष्पाताईंच्या लग्नाचा निर्णय घेतल्याने त्यांना दहावीतच शिक्षण सोडावे लागले.

पुष्पाताईंचा विवाह दिंडोरी तालुक्यातील धोंडिराम पवार यांच्याशी झाला. पवार कुटुंबाच्या वाट्यालाही गरिबी जणू पाचवीलाच पुजलेली होती. सासरी पवार परिवारातील सदस्यसंख्या मोठी होती.

पती धोंडिराम हे गल्लोगल्ली जाऊन पावविक्री करत होते. सासू-सासऱ्यांनी प्रत्येक मुलावर विभक्त कुटुंबाची जबाबदारी दिली. याच काळात मुलगी जयश्री आणि गायत्री यांच्यानिमित्ताने सदस्यसंख्या वाढल्याने आर्थिक भार वाढतच होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pushpatai pawar chaudhary
Success Story : संकल्प भामरे झळकला अमेरिकेतील New York Times Squareमध्ये

पतीच्या तेराव्यानंतर कामाला सुरवात

विभक्त झाल्यानंतर पुष्पाताई यांची धडपड सुरू असतानाच पती धोंडिराम यांचे अल्प आजाराने निधन झाले. अचानक आलेल्या संकटाने दोन मुलींची जबाबदारी पेलवताना समोर अंधार दिसत होता.

नियतीने दिलेलं दुःख मोठं असतानाही जयश्री आणि गायत्री यांच्यासाठी आधार महत्त्वाचा असल्याची त्यांना जाणीव झाली होती. पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याचा कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी थेट त्यांनी पतीने सुरू केलेला व्यवसाय पुढे नेत जणू परिस्थितीलाच आव्हान दिलं.

पुष्पाताई यांच्यावर आलेल्या या प्रसंगात सासरे राजाराम, सासूबाई गंगूबाई यांनी पुष्पाताई यांना दुकानात माल भरण्यासाठी पाच हजारांची मदत दिली. या मदतीचा पुष्पाताई यांनी पुरेपूर उपयोग करत पावविक्री, गोळ्या-बिस्किटे यांच्यासोबतच वणी शहरातील गरज ओळखून पत्रावळी, तसेच द्रोणविक्रीचे साहित्य आणले.

Pushpatai pawar chaudhary
Success Story: वयाच्या 32 व्या वर्षी 10 खासगी जेटची मालकीन, कोट्यवधींची संपत्ती; कोण आहे कनिका टेकरीवाल?

रस्त्यावरील वस्तू विक्री ते शोरूमची मालकीण

वणी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे पुष्पाताई यांचे प्रयत्न फळाला आहे. कधीकाळी दिवसाकाठी शंभर रुपयेही मिळवणे दुरापास्त असलेल्या पुष्पाताई यांनी मात्र द्रोण, पत्रावळी विक्रीतून कुटुंबाला सावरले.

कुटुंबावर आलेल्या अकाली प्रसंगातून सावरत असताना दोन्ही मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. रोजच्या रोजीरोटीच्या लढाईत शिक्षण दहावीतच सुटलेल्या पुष्पाताई यांनी स्वबळावर उभे राहताना जयश्री यांना इंजिनिअर केले, तर दुसरी मुलगी गायत्री शिक्षणासोबतच ब्यूटीक चालवते आहे.

वणी येथील तेली गल्लीत स्वमालकीच्या पत्रावळी विक्रीसोबतच महिलांसाठीच्या सौंदर्य प्रसाधनांचे प्रशस्त शोरूम उभे केले आहे.

खचून जाऊ नका

वाट्याला आलेली परिस्थिती नक्कीच बदलते, या सकारात्मक विचारांवर आयुष्याचा प्रवास सुरू असलेल्या पुष्पाताई यांच्या वाटचालीत प्रतिभा मोर, वडील राजाराम, सासू गंगूबाई, आई-वडील, तनिष्का गटप्रमुख नगमा शेख यांच्यासह माहेर तसेच सासरच्या मंडळींनी दिलेला आधार मोलाचा असल्याचे सांगताना त्यांचे डोळे भरून आले.

आर्थिक चणचण असलेल्या काळात पाच हजार रुपयांचे कर्ज न देणाऱ्या वित्तीय संस्था आज पुष्पाताई यांना भरीव कर्ज देण्यासाठी स्वतः दारात उभ्या राहिल्यात.

कुटुंबावर आलेल्या प्रसंगात खचून न जाता महिलांनी परिस्थितीला सामोरे जात स्वबळावर उभे राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे, असा सल्लाही पुष्पाताई देण्यास विसरल्या नाहीत.

Pushpatai pawar chaudhary
MPSC Success Story: दिंडोरी तालुक्यातील पौर्णिमा गावित आदिवासी मुलींमध्ये राज्यात प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com