Success Story: साकोऱ्याची रेखा लष्करात दाखल! वडिलांच्या निधनानंतर 4 महिन्यात सैन्यदलात भरती

Officials of the organization and villagers felicitating Rekha Jadhav for joining the army.
Officials of the organization and villagers felicitating Rekha Jadhav for joining the army.esakal

Success Story : 'चूल' आणि 'मुल' या जुन्या विचारांवर आधारित न राहता, पुरूषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात ती आज न डगमगता काम करत आहे. अगदी सैन्यदलात देखील महिला मागे न राहता कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

हीच प्रेरणा घेत साकोरे (ता. नांदगाव) येथील रेखा संजय जाधव ही देखील भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे. लष्करात दाखल होत गावातून पहिला महिला जवान होण्याचा मान देखील तिला मिळाला आहे.

तिच्या सैन्यदलात भरती होण्याने ग्रामीण भागातील इतर युवतींपुढे एक आदर्श रेखा हिने निर्माण केला आहे. (Success Story Rekha from Sakora joined indian Army Joined 4 months after father death nashik news)

साकोरा येथील रेखा हिचे वडील देखील सैन्यात होते. चार महिन्यांपूर्वी निवृत्त जवान संजीव दिनकर जाधव यांचे निधन झाले. त्यानंतर रेखा जाधव हिने दु:खाचा डोंगर पार करून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रचंड जिद्दीने परिश्रम करून सीमा सुरक्षा (बीएसएफ) दलात भरती झाली आहे.

या यशाबद्दल पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्था व मित्र मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यालय साकोरे येथे रेखाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

रेखा हिचे शिक्षण रयत शिक्षण संस्था संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात झाले. वडील सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर मनमाड येथे नोकरी करत असताना त्यांचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials of the organization and villagers felicitating Rekha Jadhav for joining the army.
Success Story : खडकाळ जमीन काही तासातच झाली सुपीक; शेतकऱ्याने रिस्क घेतली अन्...

परंतु वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी रेखाने बीएसएफ मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने तिने तयारी देखील सुरु केली. कुठलेही ॲकॅडमीचे प्रशिक्षण न घेता रेखाने स्वतः मेहनत करून बीएसएफ मध्ये आपले अस्तित्व सिद्ध केलं आहे.

याप्रसंगी पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत व सोसायटीचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.

केवळ योगायोग

रेखाची मुंबई येथील भरतीत निवड झाली. तिचे पुढील प्रशिक्षण सिकंदराबाद (हैदराबाद) येथे होणार आहे. योगायोग म्हणजे दिवंगत संजीव जाधव यांची देखील मुंबई येथे निवड झाली होती. आणि त्यांचे प्रशिक्षण देखील सिकंदराबाद येथे झाले होते.

Officials of the organization and villagers felicitating Rekha Jadhav for joining the army.
Success Story : जिद्दी तरुणीची पोलिस पदाला गवसणी! श्रद्धा कुऱ्हाडे बनली पहिली महिला पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com