Success Story : सालकरी ते द्राक्षनिर्यातदार : पुंजाजी बोरस्ते

grapes
grapessakal

शेतकरी कुटुंबात जन्म, वडिलांचे अठरा विश्‍व दारिद्र्य, मातृछत्र हरपलेले अशा संकटांशी झुंज देत साकोरेमिग (ता.निफाड) येथील पुंजाजी बोरस्ते यांचे बालपण गेले. वडिलांसमवेत शेती कसताना स्व. कन्हैयालाल चोपडा यांच्या शेतावर सालकरी, मोलमजुरी केली. (success story Salkari to Grape Exporter Punjaji Boraste nashik news)

उपाशी, अर्धपोटी राहून हलाखीचे जीवन व्यतीत केले. बेताच्या परिस्थितीमुळे शाळेला कायमचा रामराम ठोकला. पण जिद्दी व कष्टाच्या बळावर परिस्थितीवर मात करत सालकरी ते द्राक्षनिर्यातदार असा आयुष्याचा प्रवास त्यांनी केला.

संकटाला धीरोदात्तपणे तोंड देऊन पुढे जायचे असते, असा संदेश आपल्या कृतीतून देणारे पुंजाजी मुरलीधर बोरस्ते यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत महत्त्वाचे घटनाक्रमांना उजाळा दिला जात आहे.

परिस्थिती माणसाला घडवते. पुंजाजी बोरस्ते यांनीही दोन पैसे मिळविण्यासाठी प्रभात बॅण्ड पथक तयार केले. हाजी हबीबभाई, संपतराव माळोदे, वाळू माळोदे, वामन आहीरे, सदू आहीरे, हुलाब शेख या सहकार्यासमवेत लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात बॅण्ड वाजवून आर्थिक उदरनिर्वाह केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

grapes
Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात गढूळ पाणीपुरवठा; भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

दोन बहिणी, मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावायच्या. पुंजाजी बोरस्ते यांनी अपार कष्ट करून कुटुंबाचे अर्थार्जन केले. स्व. कारभारी बोरस्ते हे पुंजाजी बोरस्ते यांचे चुलते होते. त्यांनी सहकारमहर्षी माधवराव बोरस्ते यांच्याकडे विनंती करून विविध कार्यकारी सोसायटीत सचिवपदावर पुंजाजी बोरस्ते यांना नोकरी मिळवून दिली. एक आदर्श सचिव म्हणून त्यांचा तालुक्यात दबदबा होता.

पुढे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी साकोरे सोसायटीचे सभापतिपद भूषविले. साकोरे मिगच्या विकासात स्व. माधवराव बोरस्ते यांच्यासमवेत त्यांनी स्वतःला झोकून दिले. निफाड तालुक्यात पुंजाभाऊ अशा आदराने ओळखल्या जाणाऱ्या पुंजाजी बोरस्ते सारखे धाडसी, मेहनती व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले.

(शब्दांकन ः अशोकराव माळोदे)

grapes
Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात 2 तास वीज गायब; उपकरणे बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com