Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात गढूळ पाणीपुरवठा; भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

Citizens have to drink dirty water.
Citizens have to drink dirty water. esakal

के.टी. राजोळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्वतःच्या शेकडो एकर जमिनी धरणासाठी दिलेल्या तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.

मात्र त्यांना गढूळ पाण्याशिवाय काहीही पर्याय उरत नसल्याचे तालुक्यातील चित्र आहे. या गावांना टॅंकरने पाणीपुरवठ्याची गरज असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. (water scarcity Dirty water supply in Igatpuri taluka nashik news)

शेतीला पाणी, तरुणांच्या हाताला काम व पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला जाईल या आशेवर शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या. मात्र झाले उलटेच, महिलांच्या डोक्यावरील हंडा तर उतरला नाहीच उलट गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.

धरणग्रस्त शेतकऱ्यांची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी अन्यथा एल्गार कष्टकरी संघटना रिकामे हांडे घेऊन जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citizens have to drink dirty water.
Water Purification : गढूळ पाण्यापासून नांदगावकरांना दिलासा; शुद्धीकरण प्रक्रियेत बदल

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणासाठी जमीन दिलेल्या वळविहीर येथील आदिवासी वाडी वस्तीवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा करण्याची शासनाची योजना आहे.

परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी ही योजना आहे, की ठेकेदार व अधिकाऱ्याच्या आर्थिक पुनर्वसन करण्याची आहे असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग आणि मंत्री असताना देखील आदिवासींची दयनीय अवस्था आहे.

Citizens have to drink dirty water.
NAFED Onion Purchase : नाफेडतर्फे होणार 3 लाख क्विंटल कांदा खरेदी : डॉ. भारती पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com