Success Story : अपयशाला न जुमानणारी तेजेंद्रची जिद्द; अखेरच्या प्रयत्नात पोलिस होण्याचे स्वप्न साकार

Tejandra Shinde
Tejandra Shindeesakal

Success Story : भऊर (ता.देवळा) येथील रंगकाम करणाऱ्या आदिवासी समाजातील तेजेंद्रने जिद्द दाखवत अगदी अखेरच्या प्रयत्नात पोलिस भरतीमधील सर्व अडथळे पार करत दलात सहभागी झाला आहे.

सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थिती असताना आणि सतत अपयश येऊनही घर, प्रपंच सांभाळत तेजेंद्रने अखेर यशाचे तेज पाडल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Success Story Tejendra shinde determination not to fail last attempt dream of becoming policeman came true nashik news)

भऊर येथील तेजेंद्र अण्णा शिंदे हा गेल्या दहा वर्षांपासून पोलिस होण्याचे स्वप्न पाहत होता. वडिलांचा शेळ्या चारण्याचा उद्योग असून आई इतरांच्या शेतात मोलमजुरी करते. त्यामुळे पोलिस दलात भरती होऊन घरच्यांची हातभार लावण्याचे त्याचे स्वप्न होते.

यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही त्याला यश हुलकावणी देत होते. दरम्यानच्या काळात लग्न झाल्याने प्रपंचाला हातभार लागावा म्हणून घरांना रंगकाम सुरू केले. शेती नसल्याने सारे काही कष्टावरच अवलंबून असल्याने काम करणे पाचवीलाच पुजलेले असले तरी रोज सकाळी व्यायाम आणि सायंकाळी लेखी परीक्षेचा अभ्यास यातून पोलीस भरतीचा ध्यास कायम होता.

अखेर त्याच्या कष्टाला यश आले आणि अखेरच्या प्रयत्नात तेजेंद्रने यशाला गवसणी घालत अर्थात पोलीस भरतीत निवड होत स्वतःला सिद्ध केले. तेजेंद्र पुणे शहर पोलिस म्हणून सेवा बजावणार आहे. अश्वमेध करिअर अॅकॅडमीचे चेतन परदेशी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Tejandra Shinde
Success Story : देशसेवेतून आता किर्तांगळीचे योगेश चव्हाणके मुंबई पोलीस दलात!

तेजेंद्रच्या या यशाबद्दल सरपंच चित्रा मोरे, उपसरपंच सुनीता पवार, माजी सरपंच कारभारी पवार, सोसायटीचे अध्यक्ष अभिमन पवार, उपाध्यक्ष सिंधूबाई पवार, काशिनाथ पवार, बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार, प्रहारचे सुभाष पवार, नितीन पवार, पोलिस पाटील भरत पवार, माजी सरपंच दादा मोरे, मनीषा माळी, कौतिक पवार, जगन पवार, बापू गरुड, गंगाधर पवार, दादाजी पवार, प्रभाकर पवार आदींनी अभिनंदन केले.

"आमना कुटुंब मा काही कोणी पोलीस नही शे. प"ण आमना तेजेंद्र पोलीस जया याना बु आनंद शे. देवजवळ देर शे पण अंधार नही भाऊ." - अण्णा धोंडू शिंदे, सुनंदा शिंदे (आई, वडील).

Tejandra Shinde
Success Story: तमाशातील वगनाट्याने घडवले ऋषीकेशचे आयुष्य! ऋषीकेश व अनिकेतचा प्रेरणादायी संघर्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com