Success Story: ट्रक चालकाची मुलगी खाकी वर्दीत! दारणा सांगवी ग्राम पंचायततर्फे साक्षी फड यांचा सत्कार

Sarpanch Sachin Yadav felicitating Sakshi Phad on his appointment in the police force
Sarpanch Sachin Yadav felicitating Sakshi Phad on his appointment in the police forceesakal

Success Story : सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीत ट्रकचालकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दारणा सांगवी (ता. निफाड) येथील ज्ञानेश्‍वर आनंदा फड यांची कन्या साक्षी यांची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.

या यशाबद्दल दारणा सांगवी ग्राम पंचायततर्फे नुकताच साक्षी फड यांचा सत्कार करण्यात आला. (Success Story Truck driver daughter in khaki uniform Sakshi Phad felicitated by Darna Sangvi Gram Panchayat nashik news)

परिस्थितीमुळे शिकता आले नाही, परंतु आपल्या मुलीने शिकून मोठे होऊन पोलिस खात्यात नोकरी करावी अशी ज्ञानेश्‍वर फड यांची इच्छा होती. त्यांची पत्नी सविता यांचेही त्यांना पाठबळ मिळाले. शेती कमी असल्याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत उदरनिर्वाह करत असताना श्री. फड हे ट्रॅकचालक म्हणून काम करतात.

या परिस्थितीमुळे साक्षी यांनीदेखील पहिल्यापासूनच पोलिस खात्यात जाण्याचे स्वप्न जोपासले. गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण घेत, आई-वडिलांचे अथक परिश्रम व कष्टाला सार्थ ठरवित साक्षीने हे यश मिळवले आहे.

त्याबद्दल दारणा सांगवीसह पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, दारणा सांगवी ग्रामपंचायतीत साक्षी यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचाही समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. सरपंच सचिन यादव, पोलिस पाटील गोरक्षनाथ काकड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. सोनवणे, ग्रामसेवक दिलीप पवार, सुनील साळवे, रंगनाथ कर्पे, दशरथ आढाव, राधाकृष्ण गोडसे, तंटामुक्ती अध्यक्ष हिरामण फड, काकड,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sarpanch Sachin Yadav felicitating Sakshi Phad on his appointment in the police force
Online Shopping: ग्रामीण भागातही ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ! ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्प, बेरोजगारीत वाढ

सुनील फड, बाळासाहेब कदम, राहूल गोहाड, ज्ञानेश्‍वर कदम, विजय गोडसे, शिवनाथ मुळक, शिवाजी कदम, रोहित फड, किरण फड, रामदास फड, विलास फड, ज्ञानेश्‍वर शिरसाठ, रामचंद्र गोहाड, अशोक फड, शरद फड आदी या वेळी उपस्थित होते.

"आई-वडिलांनी अतिशय काबाडकष्ट करून मला शिकवले. मुलीने पोलिस व्हावे ही त्यांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. ही नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस खात्यात मोठे अधिकारी व्हायचे आहे." -साक्षी फड, नवनिर्वाचित पोलीस कर्मचारी

Sarpanch Sachin Yadav felicitating Sakshi Phad on his appointment in the police force
Ration Card Aadhaar Linkage : शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com