तुषार माघाडे: नाशिक- शरीर तंदुरुस्तीच्या नादात, सुदृढ होण्याच्या प्रयत्नात हृदय बंद पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चांदवडमध्ये व्यायाम करताना प्रवीण धायगुडे या पंधरावर्षीय मुलाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने, तर नाशिकमध्ये उद्योजक महेंद्र माहुरे यांचे व्यायामादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. हा एखादा अपवादात्मक योगायोग नाही. गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.