
ठाकरे गटात नाराज असलेले सुधाकर बडगुजर हे मंगळवारी भाजप प्रवेश करणार आहेत. मुंबईतल्या भाजप मुख्यालयात त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आहे. मंगळवारी सकाळी सुधाकर बडगुजर हे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले पण त्यांचा पक्ष प्रवेश आहे हे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच माहिती नाहीय. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल माझ्याकडे कोणतीच माहिती नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.