
नाशिक: ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर भाजप प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एका बाजुला बडगुजर हे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला भाजप प्रवेशासाठी रवाना झालेत. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मात्र मला पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही माहिती नाही असं सांगतायत. यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झालाय. स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याचंही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. या घडामोडींवर नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.