Sudhir Mungantiwar News : गोदाआरतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर : सुधीर मुनगंटीवार

दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या आरतीसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Forest, Cultural Affairs and Fisheries Minister Sudhir Mungantiwar while speaking at the meeting held at the Collectorate on Monday.
Forest, Cultural Affairs and Fisheries Minister Sudhir Mungantiwar while speaking at the meeting held at the Collectorate on Monday.esakal

नाशिक : दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या आरतीसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या निधीला प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.

दरम्यान, नाशिकचा पुरोहित संघ व रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे गंगादशरा अर्थात गोदावरी जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर गोदाआरती सुरू करण्यात येणार आहे. (Sudhir Mungantiwar statement Fund of 10 crore approved for Goda Aarti nashik news)

अयोध्या, वाराणसी व हरिद्वार येथील गंगाआरतीच्या पार्श्वभूमीवर गोदाआरती सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आराखडा सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला.

यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड.राहुल ढिकले, सरोज अहिरे यांनीही आपल्या सूचना यावेळी मांडल्या.

गोदाआरतीचा मूळ आराखडा ५६ कोटी ४५ लाखांचा असून, त्यात अनेक बाबींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आराखडा राज्य शासनाकडे सुपूर्द केला आहे. त्यात दुरुस्ती करून फेरआढावा सादर करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.

विशेष म्हणजे जलसंपदा विभाग व स्मार्ट सिटी यांचाही या आराखड्यात समावेश करण्याचे आदेश करण्यात आले. पण, या आराखड्यास मंजुरी देण्यापूर्वी गोदाआरती सुरु होण्यासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये तत्काळ मंजूर केला.

येत्या तीन दिवसांत हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता द्यावी आणि आठ दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून ५ मार्चपूर्वी कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.

देशातील सर्वात सुंदर आरती नाशिकची होईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास गोदावरी सेवा समितीचे सरचिटणीस मुकुंद खोचे यांनी यावेळी दिला. साधारणतः: १५ ते १७ मिनिटांची गोदाआरती होईल.

यावेळी गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सरचिटणीस मुकुंद खोचे, शांताराम भानोसे, आशिमा केला, शैलेश देवी, चिराग पाटील, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड, शिवाजी बोंदार्डे, दीपक भगत आदी उपस्थित होते.

Forest, Cultural Affairs and Fisheries Minister Sudhir Mungantiwar while speaking at the meeting held at the Collectorate on Monday.
Mumbai: अनिवासी भारतीयांना रिटेल क्षेत्रात गुंतवणुकीस प्रोत्साहन द्यावे; मसालाकिंग डॉ. दातारांची आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

पुरोहित संघ व गोदावरी सेवा समिती आमने-सामने

गोदाआरतीच्या मुद्यावरुन पुरोहित संघ व गोदावरी सेवा समितीमध्ये वाद असल्याची बाब मंत्री मुनगंटीवार यांच्यासमोर उघडकीस आली. बैठकीत पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुल्क यांनी गोदाआरती ही पुरोहित संघातर्फे व्हावी, अशी मागणी केली.

अनादी कालापासून पुरोहित संघ याठिकाणी कार्यरत असून, स्व:खर्चातून आजही गोदाआरती होते. तसेच यापुढेही गोदाआरतीचा मान पुरोहित संघाला द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. पण गोदाआरतीसाठी आवश्यक खर्च हा गोदावरी सेवा समितीने निर्माण केला आहे.

त्यामुळे दोघांनी एकत्रितपणे चर्चेतून हा विषय सोडवावा. अन्यथा हा निधी मला चंद्रपूरला घेवुन जावा लागेल, असा इशारा वजा धमकीच त्यांनी भर सभेत दिली.

स्मार्ट सिटीचे पितळ उघडे

गोदावरी नदीच्या सुशोभिकरणासाठी स्मार्ट सिटीला ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील ९९ टक्के काम पूर्ण झाल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंग मोरे यांनी सांगितले. यावर आमदार फरांदे यांनी जोरदार आक्षेप घेत रामतिर्थात कुठल्या स्वरूपाचे काम झालेले नसल्याचे सांगितले.

यावरुन आमदार फरांदे व मोरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे बघायला मिळाले. अखेर मंत्री मुनगंटीवार यांनी मध्यस्थी करत आता स्मार्ट सिटीचा विषय बाजूला ठेवून नवीन आराखड्यावरच लक्ष केंद्रीय करण्याचे आवाहन केले.

पहिल्या टप्प्यातील कामे

- रामतिर्थावर घाट निर्माण करण्यात येतील

- लाईट्सची व्यवस्था

- साऊंड सिस्टिम

- एलईडी स्क्रीन

- भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा

Forest, Cultural Affairs and Fisheries Minister Sudhir Mungantiwar while speaking at the meeting held at the Collectorate on Monday.
kamgar Natya Spardha : कामगार नाट्य स्पर्धेत ‘हम दो नो’ ची बाजी! नाशिक केंद्र द्वितीय तर संगमनेर तृतीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com