
माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) कारखाना निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी मन पसंत चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारांची आज बारामती निवडणूक कार्यालयात चांगलीच रस्सीखेच झाली. निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार नितीन सातव हे पहाटे पासूनच चिन्ह मिळवण्यासाठी रांगेत प्रथमदर्शनी उभे होते. विरोधी गटाचे प्रमुख रंजन तावरे नंतरच्या कालावधीत आले आणि त्यांनी रांग सोडून कार्यालयात प्रवेश केला. त्यावर अक्षेप घेत सातव यांच्यासह रांगेतील उमेदवारांनी तावरे यांना प्रवेशासाठी विरोध केला.